‘प्रतीक्षेची गुढी’, गुढीपाडव्याचा गोडवा गॅसच्या रांगेत हरवला; ऐन सणात गृहिणींचा स्वयंपाक अर्ध्यावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 14:10 IST2026-03-20T14:05:18+5:302026-03-20T14:10:02+5:30

"दारात पाहुणे, चुलीवर धूर अन् हातात रिकामे सिलिंडर!"; गुढीपाडव्याचा गोडवा गॅसच्या रांगेत, उन्हाच्या चटक्यांमध्ये हरवला...

Gas Crisis in Chhatrapati Sambhajinagar on Gudi Padwa: Women Wait in Long Queues; Festival Joy Fades Amidst Shortage | ‘प्रतीक्षेची गुढी’, गुढीपाडव्याचा गोडवा गॅसच्या रांगेत हरवला; ऐन सणात गृहिणींचा स्वयंपाक अर्ध्यावर!

‘प्रतीक्षेची गुढी’, गुढीपाडव्याचा गोडवा गॅसच्या रांगेत हरवला; ऐन सणात गृहिणींचा स्वयंपाक अर्ध्यावर!

- प्राची पाटील
छत्रपती संभाजीनगर :
मराठी नववर्षाची सुरुवात... दारात सप्तरंगी रांगोळी, उंचावर डौलाने फडकणारी गुढी आणि घरात गोडाधोडाच्या स्वयंपाकाची लगबग. गुढीपाडव्याचे हे नेहमीचे चित्र यंदा अनेक घरांमध्ये मात्र वेगळेच होते. ऐन सणाच्या दिवशी गॅस सिलिंडर संपल्याने आनंदाची गुढी उभारण्याऐवजी, कडक उन्हात गॅससाठी तासनतास ‘प्रतीक्षेची गुढी’ उभारण्याची वेळ शेकडो नागरिकांवर आली. लोकमतने शहरातील काही ठिकाणी पाहणी केली असता सणाचा गोडवा हा गॅसच्या रांगेत आणि उन्हाच्या चटक्यांमध्ये हरवून गेल्याचे पाहायला मिळाले.

चिकलठाणा येथील योगेश्वरी गॅस सेंटरबाहेर सकाळी ८ वाजेपासून लागलेली महिलांची रांग विदारक वास्तव मांडत होती. कार्यालय उघडले थेट ११ वाजता. रांगेत हताशपणे उभ्या असलेल्या पुष्पा दौड उद्वेगाने म्हणाल्या, सकाळपासून चहाचा एक घोटही घेतला नाही. घरात सगळा पसारा तसाच टाकून आले. आता बारा वाजलेत, तरी नंबर लागलेला नाही. घरी जाऊन गोडाचा स्वयंपाक कधी करणार आणि सण कधी साजरा करणार? रंजना गांगुर्डे यांचीही अवस्था यापेक्षा वेगळी नव्हती. त्या म्हणाल्या, सणाच्या दिवशी सकाळीच गॅस संपला.

दारात पाहुणे...
शहरातील एपीआय कॉर्नर, एन-६, बजरंग चौक या सर्वच ठिकाणी चित्र कमी-अधिक फरकाने सारखेच होते. एपीआय कॉर्नर येथील भारत गॅस कार्यालयासमोर वेगळीच शोकांतिका पाहायला मिळाली. एजन्सीचे मालक गंगाधर काकडे यांच्या निधनामुळे कार्यालय बंद होते. मात्र, गॅसच्या आशेने वाळूज, देवळाई, साताऱ्याहून आलेले नागरिक रिकाम्या हाताने परतत होते. वाळूजचे राजेश जाधव हताश होऊन इकडे आले होते. तर, दिलीप कांबळे यांच्या घरी सणासाठी पाहुणे आले होते. पाहुण्यांना घरात बसवून ते गॅसच्या शोधात वणवण भटकत होते.

- वृद्ध उन्हात
चिकलठाण्यात चक्क ७० वर्षांचे वृद्ध छगन आव्हाळे पाडव्याच्या दिवशी कडक ऊन सहन करत गॅससाठी रांगेत उभे होते. कल्याण थोरात यांचा स्वयंपाक गॅसवर अर्धाच झाला होता आणि गॅस संपला. उरलेला स्वयंपाक पूर्ण करण्यासाठी ते घाईघाईने सिलिंडर मिळवायला आले होते. बबिता नाडे यांचा गॅस चक्क ८ दिवसांपूर्वी संपला होता. ८ दिवस चुलीवर धूर खात स्वयंपाक केल्यानंतर पाडव्याला तरी गॅस मिळेल ही आशा होती, पण आजही त्यांना आणखी ८ दिवस लागतील असेच उत्तर मिळाले.

Web Title : गुड़ी पड़वा की मिठास गैस की कतारों में खोई; खाना अधूरा!

Web Summary : गुड़ी पड़वा का उत्सव गैस की कमी के कारण फीका पड़ गया। गैस एजेंसियों पर लंबी कतारें लगीं, जिससे त्योहार की तैयारी बाधित हुई। कुछ एजेंसियां बंद थीं, जिससे बुजुर्गों समेत कई लोग फंसे रहे और पारंपरिक व्यंजन नहीं बना पाए।

Web Title : Gudi Padwa's sweetness lost in gas queues; cooking incomplete!

Web Summary : Gudi Padwa celebrations were marred as gas shortages left many families struggling. Long queues formed at gas agencies, disrupting festive cooking. Some agencies were closed, leaving people, including the elderly, stranded and unable to prepare traditional dishes.