शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

देवस्थानांमध्येही दांडगाई !

By admin | Updated: December 8, 2015 00:08 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड दु:खी, पीडित लोक देवाकडे न्यायाची याचना करतात;परंतु जिल्ह्यातील बहुतांश देवस्थानांच्या मालमत्ता धनदांडग्यांनीच गिळंकृत केल्या असून

व्यंकटेश वैष्णव , बीडदु:खी, पीडित लोक देवाकडे न्यायाची याचना करतात;परंतु जिल्ह्यातील बहुतांश देवस्थानांच्या मालमत्ता धनदांडग्यांनीच गिळंकृत केल्या असून देवदैवतांनाच घेरले आहे. नियमबाह्य मालकी रद्द करुन मालमत्ता पुन्हा देवस्थानांच्या नावे करण्याचे न्यायालयाचे आदेश डावलण्याचे धाडसही काहींनी केले आहे. मार्च २०१५ पासून कारवाईच्या नावाने केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत. दांडगाई करणाऱ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांचाच वरदहस्त असल्याने ‘अरे देवा’ म्हणण्याची वेळ आली आहे.देवस्थानांच्या जमिनीच्या वादासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. महाराष्ट्र शासनाने ३० जुलै २०१० दरम्यान देवस्थानच्या जमिनींची तपासणी तसेच बेकायदेशीर हस्तांतरीत झालेल्या असतील तर तपासणी करून देवस्थानच्या नावे कराव्यात असा आदेश दिलेला आहे. याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना याबाबत काय कारवाई केली आहे. याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला द्यावा, असे ९ महिन्यापूर्वी लेखी पत्राद्वारे सांगितले आहे. मात्र याबाबत उपविभागीय कार्यालयाने कुठलीच पावले उचलेली नाहीत.देवस्थानांच्या जमिनी बळकावणाऱ्यांमध्ये बहुतांश जण प्रतिष्ठित आहेत. अनेकांनी प्रतिष्ठेच्या जोरावरच देवदेवतांनाही अक्षरश: ‘मामा’ बनवले आहे. अंबाजोगाईतील योगेश्वरी देवीच्या जमिनी अनाधिकृतरित्या वहिती केल्या जात आहेत. काहींनी ‘लक्ष्मीदर्शन’ घडवून मालमत्तेवर आपले बस्तान बसविले आहे. देवस्थानच्या मालमत्ता लुटणाऱ्यांचे पेव फुटलेले असताना प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत आहे. जिल्हयात हजारो एकर जमीन देवस्थानाची आहे. याची नोंद धर्मदाय आयुक्त कार्यालयात करणे बंधनकारक आहे. मात्र जमिनी लाटण्यासाठी देवस्थानच्या जमिनीच्या नोंदी न्यास कार्यालयात करत नाहीत. तहसिलदार व तलाठी यांना हाताशी धरून अशा अनेक देवस्थानाच्या जमिनी धनधांडग्यांनी लाटल्या आहेत. व याबाबतचे रेकॉर्डच कार्यालयातून गहाळ होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. याबाबत प्रशासन गंभीर नाही. असा आरोप सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांनी केला आहे.