बाजारपेठेत चोरी करणाऱ्या महिलांची टोळी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:04 IST2021-07-29T04:04:41+5:302021-07-29T04:04:41+5:30

यावरून सिटी चौक पोलिसांच्या पथकाने ‘सीसीटीव्ही’ची पाहणी केली. तेव्हा गुलमंडी भागात संशयित महिला आढळून आल्या. त्यांना महिला पोलीस अंमलदारांसमक्ष ...

A gang of women caught stealing in the market | बाजारपेठेत चोरी करणाऱ्या महिलांची टोळी पकडली

बाजारपेठेत चोरी करणाऱ्या महिलांची टोळी पकडली

यावरून सिटी चौक पोलिसांच्या पथकाने ‘सीसीटीव्ही’ची पाहणी केली. तेव्हा गुलमंडी भागात संशयित महिला आढळून आल्या. त्यांना महिला पोलीस अंमलदारांसमक्ष हटकले असता पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस उपनिरीक्षक के.डी. महांडुळे यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांना पोलीस ठाण्यात आणून महिला पोलिसांसमक्ष चौकशी केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारले असता, त्यांनी पर्सच्या चोरीची कबुली दिली. यानंतर चार महिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.बी. पवार, दुय्यम निरीक्षक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक के.डी. महांडुळे, पोलीस कर्मचारी माजिद पटेल, देशराज मोरे, अभिजित गायकवाड, रोकडे, भोपळे, बढेकर, नेव्हल यांच्या पथकाने केली आहे. अधिक तपास अफसर पठाण करीत आहेत.

Web Title: A gang of women caught stealing in the market