सिल्लोडमध्ये घरात घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 19:53 IST2020-02-08T19:50:49+5:302020-02-08T19:53:05+5:30

बलात्कारानंतर आरोपींची महिलेस जीवे मारण्याची धमकी

gang rape on women at sillod | सिल्लोडमध्ये घरात घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार

सिल्लोडमध्ये घरात घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार

सिल्लोड: शहरातील एका ३३ वर्षीय महिलेच्या घरात घुसून सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोघांवर सिल्लोड शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केला आहे. केशव जाधव व विशाल निकम अशी आरोपींची नावे आहेत. 

केशव जाधव व विशाल निकम यांनी १४ डिसेंबरच्या रात्री महिलेच्या घरी घुसून जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. काही दिवसानंतर केशव जाधवने महिलेस त्रास देत शरीर सुखाची मागणी केली. यानंतर घाबरलेल्या महिलेने हिम्मत करून शुक्रवारी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी दोन्ही आरोपिंविरूढ रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलीस निरिक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शन खाली फौजदार नालंदा लांडगे या करीत आहे.

Web Title: gang rape on women at sillod