बजाजनगरात गजानन महाराजांची पालखी मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:20 IST2019-02-26T00:20:40+5:302019-02-26T00:20:56+5:30
बजाजनगरातील ब्रह्मांडनायक गजानन महाराज मंदिर व स्नेहसहयोग हौसिंग सोसायटीतर्फे प्रकट दिनानिमित्त सोमवारी गजानन महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.

बजाजनगरात गजानन महाराजांची पालखी मिरवणूक
वाळूज महानगर : बजाजनगरातील ब्रह्मांडनायक गजानन महाराज मंदिर व स्नेहसहयोग हौसिंग सोसायटीतर्फे प्रकट दिनानिमित्त सोमवारी गजानन महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
बजाजनगरातील मुख्य मार्गावरून गजानन महाराजांच्या पालखीची सोमवारी सकाळी टाळ-मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिला भाविकांनी गजानन महाराजांच्या नावाचा गजर करीत फुगडी व पावली खेळण्याचा आनंद घेतला. येथील आरएम सेक्टरमधील स्नेह सहयोग सोसायटीत श्रीमद् भागवत कथा सप्ताह आणि पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते, तर गजानन महाराज मंदिरात हरिनाम सप्ताह, कीर्तन व धार्मिक कार्यक्रम पार पडला. अरविंद महाराज उपाध्ये, ह.भ.प. राम महाराज अंबुले, माऊली महाराज सजगुरे, बाळकृष्ण महाराज दिघे यांनी कीर्तनातून समाजप्रबोधन केले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला दीपक न्यायाधीश, सिद्राम पारे, अशोक कुलकर्णी, संजय बोबडे, रवींद्र कान्नव, अच्युतराव पाटील, सुभाष तांबे, अंकुश फुके, पाराजी कुबेर, बाजीराव वरुडे, भगवान जाधव, वसंत पाटील, भारत कोकाटे, राजाराम भोसले आदींसह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.