शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

कसाब यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

By admin | Updated: May 7, 2014 00:29 IST

बदनापूर : नानेगाव येथील सरपंच मनोज कसाब यांच्या पार्थिवावर गावात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बदनापूर : नानेगाव येथील सरपंच मनोज कसाब यांच्या पार्थिवावर गावात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी मनोज कसाब यांच्या निधनाची वार्ता कळताच गावात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. पोलिस प्रशासनाने लगेचच या गावात मोठा बंदोबस्त वाढविला. संतप्त नातेवाईकांनी कसाब यांचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात नेल्यानंतर खळबळ उडाली. सर्व आरोपींना अटक करावी, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली. यावेळी पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी सर्व आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून अटकही करण्यात आली असल्याची माहिती दिल्यानंतर कसाब यांचा पार्थिव गावी आणण्यात आला. सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंंह, माजी मंत्री गंगाधर गाडे, रिपाइंचे नेते अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण, मातंग मुक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक साबळे, भारिप बहुजन महासंघाचे सुधाकर निकाळजे, सुधाकर रत्नपारखे, मुकुंद सोनवणे, एन. डी. गायकवाड, बदनापूरचे सरपंच राजन मगरे, केळीगव्हाणचे राहुल तुपे आदी उपस्थित होते. कसाब यांच्या कुटुंबियांना २५ लाख रूपये आर्थिक मदत द्यावी, त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे व हा खून खटला चालविण्याकरीता अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली.सन २०१० मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मनोज कसाब हे राखीव जागेवर विजयी झाले होते. त्यानंतर ९ ग्रा.पं. सदस्य असलेल्या सरपंच पदाकरीता त्यांची निवड झाली. मनोज हे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, ६ भाऊ, २ बहिणी असा मोठा परिवार आहे. (प्रतिनिधी)