स्मशानभूमी नसल्याने भर पावसात सरणावर ताडपत्री धरून अंत्यसंस्कार; मन हेलावणारी घटना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 18:58 IST2025-09-02T18:58:16+5:302025-09-02T18:58:40+5:30

स्मशानभूमीसाठी जागा मंजूर होऊनही चार महिने झाले. पण, कागदी घोडे अजूनही धावत आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

Funeral held under tarpaulin on a roof in heavy rain due to lack of crematorium; Heartbreaking incident in Chhatrapati Sambhajinagar | स्मशानभूमी नसल्याने भर पावसात सरणावर ताडपत्री धरून अंत्यसंस्कार; मन हेलावणारी घटना!

स्मशानभूमी नसल्याने भर पावसात सरणावर ताडपत्री धरून अंत्यसंस्कार; मन हेलावणारी घटना!

छत्रपती संभाजीनगर/ खुलताबाद : स्मशानभूमीवर नसल्याने पडत्या पावसात सरणावर चक्क ताडपत्री पकडण्याची वेळ नातेवाइकांवर आली. हा प्रकार सोमवारी (दि. १) तालुक्यातील खांडी पिंपळगावात पाहायला मिळाला. पडत्या पावसात वारंवार सरण विझत असल्याने १५ लिटरपेक्षा जास्त डिझेलचा वापर करावा लागला. यामुळे नातेवाइकांनी संताप व्यक्त केला.

खुलताबाद तालुक्यातील खांडीपिंपळगाव येथील पांडुरंग शहाजी भालेराव यांचे सोमवारी सकाळी ८:३० वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दलित वस्ती शेजारील एक नातेवाईक कसत असलेल्या गायरान जमिनी परिसरात दुपारी तीन वाजता उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, अंत्यसंस्कारावेळी दुपारी तीन वाजता उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, अंत्यसंस्कारावेळी दुपारी तीन वाजता पाऊस सुरू झाला. त्यामुळे चार जणांनी जळत्या सरणावर ताडपत्री धरली होती.

स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने गायरान जमीन उपलब्ध करून देण्यासाठी तहसीलदारांकडे मागणी केलेली आहे. पथकाने गावात पाहणीही केली, मात्र पुढे काय झाले ते समजलेच नसल्याचे गावातील मिठ्ठ महालकर यांनी सांगितले. गावातील लोक ज्याच्या त्याच्या शेतात अंत्यसंस्कार करतात. मात्र, शेतीच नसलेल्यांची गैरसोय होऊन उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात, असे महेश उबाळे यांनी सांगितले.

जिल्ह्यात २३१ गावांत स्मशानभूमी नसल्याचे आणि ३१० गावांतील स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी अद्याप रस्ता नसल्याचे धक्कादायक वास्तव लोकमतने रविवारच्या अंकात मांडले. त्यानंतर, खांडेपिंपळगाव येथील मन हेलावणारा आणि प्रशासकीय टोलवाटोलवीचा हा प्रकार समोर आला. पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी जागा नसल्याने, ग्रामीण भागात गैरसोय असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या एका पाहणीतून समोर आले. या सर्वेक्षणात १,३३२ पैकी २३४ गावांत सातबाराला नोंद असताना त्याचा स्मशानभूमी म्हणून वापर होत नसल्याचे समोर आले, तर २३१ गावांत स्मशानभूमीच नसल्याने अंत्यसंस्कार खुल्या जागेवर करावे लागतात.

अन्यथा आंदोलन
खांडीपिंपळगाव येथे इतरांना शेतजमिनी आहेत. मात्र, दलित व इतर मागासवर्गीयांना शेतीच नाही. त्यामुळे दलित स्मशानभूमीसाठी लवकरात लवकर शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अन्यथा यानंतर तहसील कार्यालयसमोर मृतदेहावर अंत्यसंस्कार करून आंदोलन करण्यात येईल.
-प्रवीण इंगळे, सामाजिक कार्यकर्ते

अनेक वर्षांपासून स्मशानभूमी नाही
खांडेपिंपळगावमध्ये अनेक वर्षांपासून स्मशानभूमी नाही. प्रशासकीय अंमलबजावणी होत नसल्याने ही हालअपेष्टा वाट्याला येत आहे.
- सुभाष भालेराव, ग्रामपंचायत सदस्य तथा मृताचे नातेवाईक

चार महिन्यांपूर्वी मंजुरी
चार महिन्यांपूर्वी खांडेपिंपळगांव येथे १५ गुंठे जागा गायरान जमिनीतून देण्याचा निर्णय घेतला असून, तशी सातबारावर नोंदही घेतली आहे, परंतु खुलताबाद तहसील व तलाठी पातळीवरील यंत्रणेने या कामासाठी गती दिली नाही.
- संतोष गोरड, उपविभागीय अधिकारी

२३१ गावांत नाही स्मशानभूमी
तालुक्याचे नाव......गावांची सख्या......स्मशानभूमी नसलेली गावे
छत्रपती संभाजीनगर....५९.........................०१
ग्रामीण.....................१५३...........................०५
पैठण.......................१८९.........................३९
फुलंब्री.....................९२...........................१८
गंगापूर....................२२६........................४५
वैजापूर..................१३५.......................११
खुलताबाद.............७४......................१८
कन्नड...................१९६.......................३९
सिल्लोड..............१२४.....................४२
सोयगाव.............८४.........................१३
एकूण ..................१३३२....................२३१

Web Title: Funeral held under tarpaulin on a roof in heavy rain due to lack of crematorium; Heartbreaking incident in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.