शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील विहिरीला निधीची कोरड

By admin | Updated: April 25, 2016 23:33 IST

गोविंद इंगळे , निलंगा सप्टेंबर २०१५़़़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिलाच दुष्काळी दौरा निलंगा तालुक्यात़़़ या दौऱ्यात सिंचन विहिरीचे उद्घाटन करण्यासाठी रातोरात तोंडी मंजुरी देवून

गोविंद इंगळे , निलंगासप्टेंबर २०१५़़़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिलाच दुष्काळी दौरा निलंगा तालुक्यात़़़ या दौऱ्यात सिंचन विहिरीचे उद्घाटन करण्यासाठी रातोरात तोंडी मंजुरी देवून निटूरच्या एका महिला शेतकऱ्याच्या शेतात मार्कआऊट पडले़ अचानक झालेल्या या लाभाने हुरळून गेलेल्या त्या शेतकऱ्याने पदरमोड करुन ५ लाख खर्च केले़ विहीर पूर्ण झालीही़ पण, अद्याप एक छदामही तिच्या पदरी पडला नाही, असा आरोप महिला शेतकऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना केला़ निलंगा तालुक्यातील निटूर येथील लक्ष्मीबाई बंडाप्पा हासबे या शेतकरी महिलेचे निटूर रस्त्यालगतच शेत आहे़ या रस्त्यावरुनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सप्टेबर २०१५ मध्ये पहिला दुष्काळी दौरा निघाला होता़ त्यांच्या दौऱ्याच्या मार्गावर प्रशासनाने एका दिवसात वातावरणाचा नूर पालटून टाकला़ ठिकठिकाणी शेततळी, सिंचन विहिरींचे मार्कआऊट टाकून दिले़ त्यातीलच एक लक्ष्मीबाई हासबे़ त्यांच्या शेतातही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी असेच रातोरात मार्कआऊट टाकून दिले़ लक्ष्मीबार्इंना सिंचन विहिरीची तोंडीच मंजुरी देवून हे काम उरकण्यात आले़ कदाचित् मुख्यमंत्री तयार झाले तर त्यांच्याच हस्ते या विहिरीचे उद्घाटन करण्याचा प्रशासनाचा बेत़ ध्यानीमनी नसताना अन् वर्षानुवर्षे कागदांची पुंगळी घेवून प्रशासनाचे उंबरे झिजविले तरी मंजुरी मिळत नसताना आपल्या शेतात थेट विहिरीचे मार्कआऊट पडल्याने लक्ष्मीबाई हुरळून गेल्या़ दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री आले तसे गेलेही़ या विहिरीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होवू शकले नाही़ मात्र, लक्ष्मीबार्इंनी मंजुरी मिळाल्याचे गृहीत धरुन पदरमोड करीत या विहिरीवर आतापर्यंत ५ लाख रुपये खर्च केले़ ५१ फूट खोलीची विहीर पूर्णत्वास नेलीही़ त्यास चांगले पाणी लागले़ हा आनंद असला तरी मुख्यमंत्र्यांनी पाठ करताच प्रशासनातील अधिकारी लक्ष्मीबाईंच्या विहिरीस विसरुनच गेले़ आज सात महिन्यांहून अधिक कालावधी उलटला असला तरी लक्ष्मीबार्इंच्या हाती एक रुपयाही या प्रशासनाने टेकवला नाही़ अनुदानासाठी पंचायत समितीला हेलपाटे मारुन चप्पल झिजली़ पण, अधिकाऱ्यांना पाझर फुटला नाही़ पैश्याचे नाव घेतले की, केवळ कौतुकाची थाप देवून टोलवाटोलवी केली जात असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया लक्ष्मीबाई हासबे यांनी दिली़ \त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या मार्गावर प्रशासनाने एका दिवसात वातावरणाचा नूर पालटून टाकला़ ठिकठिकाणी शेततळी, सिंचन विहिरींचे मार्कआऊट टाकून दिले़ त्यातीलच एक लक्ष्मीबाई हासबे़ त्यांच्या शेतातही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी असेच रातोरात मार्कआऊट टाकून दिले़ लक्ष्मीबार्इंना सिंचन विहिरीची तोंडीच मंजुरी देवून हे काम उरकण्यात आले़ कदाचित् मुख्यमंत्री तयार झाले तर त्यांच्याच हस्ते या विहिरीचे उद्घाटन करण्याचा प्रशासनाचा बेत़ मात्र उद्घाटन होऊ शकले नव्हते.