हिवरा येथे प्रेरणा स्वाध्याय मंडळामार्फत मोफत पाणीवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:57 IST2019-06-05T22:57:37+5:302019-06-05T22:57:49+5:30

औरंगाबाद तालुक्यातील हिवरा येथे दशाहुम्मड जैन समाजाच्या प्रेरणा स्वाध्याय मंडळा, औरंगाबाद यांच्यामार्फत टँकरद्वारे मोफत पाणी वाटप करण्यात आले.

 Free water dispute through Motivation Swadhyay Mandal at Hivar | हिवरा येथे प्रेरणा स्वाध्याय मंडळामार्फत मोफत पाणीवाटप

हिवरा येथे प्रेरणा स्वाध्याय मंडळामार्फत मोफत पाणीवाटप

शेंद्रा : औरंगाबाद तालुक्यातील हिवरा येथे दशाहुम्मड जैन समाजाच्या प्रेरणा स्वाध्याय मंडळा, औरंगाबाद यांच्यामार्फत टँकरद्वारे मोफत पाणी वाटप करण्यात आले. हिवरा गावाला मे महिन्यात १० टँकर्सद्वारे पाणी देण्यात आले.

लवकरच गोलटगाव येथील छावणीत चारा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या सदस्य तनुजा गांधी यांनी दिली.

हिवरा येथे पाणी वाटपाचा शुभारंभ मंडळाच्या सदस्या अंजली मेहता, तनुजा गांधी, शर्मिला गांधी, साधना शहा, रश्मी शहा, स्वरूपा शहा, दीपा दोशी, मंगल मेहता, प्रिया शहा आदींच्या उपस्थितीत करण्ययात आला आला.

यावेळी राजू पोफळे, कल्याण पोफळे, प्रदीप पोफळे, सचिन पोफळे, सुरेश पोफळे आदींची उपस्थिती होती.

Web Title:  Free water dispute through Motivation Swadhyay Mandal at Hivar