शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांसाठी मोफत प्रशिक्षण

By admin | Updated: June 17, 2014 00:52 IST

नांदेड : स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, नाबार्ड तसेच शासनाच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ग्रामीण बेरोजगार युवकांसाठी

नांदेड : स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, नाबार्ड तसेच शासनाच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ग्रामीण बेरोजगार युवकांसाठी १६ जून ते ३१ मार्च २०१५ पर्यंत विविध व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे़ या प्रशिक्षणासाठी उमेदवार निवडताना आवड, शारीरिक क्षमता, आर्थिक मागासलेपण लक्षात घेतले जाते़ शिवाय तो ग्रामीण भागातीलच रहिवासी असणे अपेक्षित आहे़ दरम्यान मुलाखतीनंतर या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्यांना प्रशिक्षण कालावधीत निवास व भोजनाची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे़ या प्रकल्पाचे संचालक जयंत वरणकर म्हणाले, ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविला जातो़ १६ जूनपासून मल्टीफोन सर्व्हिसींग (मोबाईल रिपेअरींग) प्रशिक्षण सुरू होणार आहे़ त्याचा कालावधी ३० दिवसांचा असेल़ प्रवेशपात्र प्रशिक्षणार्थींना पूर्णवेळ प्रशिक्षणस्थळी रहावे लागेल़ इच्छुकांनी ओळखपत्र (मतदान कार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, पॅनकार्ड पैकी एक), शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड किंवा रहिवासी दाखला, उमेदवार दारिद्रय रेषेखालील असेल तर त्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचे सात छायाचित्रे आणावे़ दरम्यान, १७ जुलैपासून इलेक्ट्रीक उपकरणे दुरूस्ती, १८ आॅगस्टपासून ड्रेस डिझायनिंग फॉर जेन्टस् (टेलरींग), ९ सप्टेंबरपासून गृहोपयोगी वस्तू बनविणे, २४ सप्टेंबरपासून नळ व पाईपलाईन दुरूस्ती, २८ आॅक्टोबरपासून दूग्ध व्यवसाय व गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण, १४ नोव्हेंबरपासून महिलांसाठी आर्टीफिशियल फ्लॉवर मेकींग, १ डिसेंबरपासून युवकांसाठी बेसिक कॉम्प्युटर, ३ जानेवारीपासून महिलांसाठी दूग्धव्यवसाय व गांडूळ खत निर्मिती, १६ जानेवारीपासून ग्रामीण उद्योजक विकास कार्यक्रम, ३० जानेवारीपासून बेसिक फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी, २३ फेब्रुवारीपासून महिलांसाठी मेणबत्ती बनविणे तर २ मार्चपासून युवकांसाठी मोटरसायकल दुरूस्ती प्रशिक्षण होणार आहे़ (प्रतिनिधी)आजपासून मोबाईल रिपेअरींगचे प्रशिक्षण सुरू होणार१७ जुलैपासून घरगुती इलेक्ट्रीक उपकरणे दुरूस्ती प्रशिक्षण१८ आॅगस्टपासून ड्रेस डिझायनिंग फॉर जेन्टस् (टेलरींगचे प्रशिक्षण) ९ सप्टेंबरपासून गृहोपयोगी वस्तू बनविणे२४ सप्टेंबरपासून नळ व पाईपलाईन दुरूस्ती,ग्रामीण युवा प्रशिक्षणार्थ्यांसाठी निवास- भोजनाची मोफत सुविधा