शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

फळबाग विम्यातही बोगसगिरी; ३० टक्के शेतकऱ्यांचे विमा अर्ज अपात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 20:03 IST

फळबाग विमा योजनेत सर्वाधिक बोगसगिरी जालना जिल्ह्यात झाली आहे.

- बापू सोळुंकेछत्रपती संभाजीनगर : लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने १ रुपयांत पीक विमा योजना आणली. या योजनेतील बोगस विमा घोटाळा गतवर्षी उघडकीस आल्यानंतर फळबाग विम्यातील बनवेगिरी आता समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांतील एकूण फळबाग विमा अर्जांच्या ३० टक्के अर्ज बोगस असल्याचे आढळून आले. कृषी विभाग आणि विमा कंपनीने विभागातील १२ हजार ३१५ बोगस फळबागधारकांचे विमा अर्ज अपात्र ठरविले आहेत. यात सर्वाधिक अपात्र शेतकरी जालना जिल्ह्यातील आहेत.

२०२३ पासून राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा दिला जातो. एक रुपयात पीकविमा मिळत असल्याचे पाहून अनेक जिल्ह्यांत बोगस पीकविमा काढून आपले उखळ पांढरे करुन घेण्याचा प्रयत्न केला हाेता. सीएससी सेंटर चालकाला हाताशी धरुन सरकारी मालकीच्या शेकडो एकर जमिनीवर पीक पेरल्याचा बोगस विमा काढण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले होते. शासनाने फळबाग विम्यासाठी एक रुपयांत विम्याची योजना लागू केलेली नाही. यामुळे फळबागेचा विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना विम्याचा हप्ता कंपनीकडे भरावा लागतो.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १३ हजार २८६ बागायतदार शेतकऱ्यांनी त्यांच्या फळबागेचा मृगबहारासाठी विमा उतरविला होता. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे १८ हजार ९२२ फळबाग विम्याचे अर्ज विमा कंपनीला मिळाले होते. बीड जिल्ह्यातील ३ हजार ४२३ शेतकऱ्यांचे विमा अर्ज होते. या अर्जांची विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संयुक्त पडताळणी केली. तेव्हा अनेक धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आले. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे अस्तित्वात नसलेल्या फळबागेचा विमा उतरविल्याचे दिसून आले. तर काहींनी त्यांच्या शेतातील फळबागेपेक्षा दुप्पट, तीनपट क्षेत्राचा विमा उतरविला. काहींनी दुसऱ्यांच्या जमिनीवरील बागेचा विमा काढल्याचे दिसून आले.

जालना जिल्ह्यात सर्वाधिक बोगसगिरीफळबाग विमा योजनेत सर्वाधिक बोगसगिरी जालना जिल्ह्यात झाली आहे. जालना जिल्ह्यातील ७९२५ शेतकऱ्यांचे फळबाग विमा अर्ज अपात्र ठरविण्यात आले. माजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १३ हजार २८६ विमा अर्जापैकी ४ हजार ३३ अर्ज अपात्र ठरले आहेत. माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील ३५७ शेतकऱ्यांनी फळबाग विम्यात ही बनवेगिरी करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र