शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

बोगस शिक्षक भरती करून फसवणूक ; निवृत्त शिक्षणाधिकारी, संस्थाचालकासह पाच जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 19:37 IST

या प्रकरणात पोलिसांनी तक्रारदार यांच्या अर्जावर कारवाई न केल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली.

औरंगाबाद : बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षिकेची नेमणूक करून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून तत्कालीन शिक्षणाधिकारी चव्हाणसह, संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि इतर अशा पाच जणांविरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

महाराष्ट्र विद्यार्थी विकास असोसिएशन रांजणगाव शेणपुजी संसस्थेचा अध्यक्ष काकासाहेब एकनाथराव जाधव (५६), संस्था सचिव कल्पना काकासाहेब जाधव-गवळी (४८), माजी मुख्याध्यापक तथा सहशिक्षक शाम बाबूराव गोलार (३८), शिक्षिका मंगला रमेश धुमाळ आणि शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांचा आरोपीत समावेश आहे.

महेंद्रसिंग प्रेमसिंग पाटील (३८, रा. माणिकनगर, नारेगांव) हे बडतर्फ शिक्षक आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार आरोपी संगीता धुमाळ यांच्या वैयक्तिक मान्यतेचा बनावट प्रस्ताव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयात आरोपी संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांनी १५ एप्रिल २०१९ रोजी सादर केला होता. या प्रस्तावात त्यांनी यापूर्वीच्या जावक क्रमांकाचा उल्लेख करून त्यानुसार धुमाळ यांना मान्यता देऊन त्यांचे वेतन काढण्याची विनंती केली होती. यानुसार शिक्षणाधिकारी कार्यालयाने धुमाळ यांचे वेतन अदा केले होते. प्रत्यक्षात संस्थाचालक यांनी ज्या जावक क्रमांकाच्या आधारे त्यांना मान्यता देण्यात आल्याचे दाखविण्यात आले होते. त्या प्रस्तावात धुमाळ यांचे नाव नव्हते. असे असताना शिक्षणाधिकाऱ्यांनी आरोपीसोबत संगनमत करून बनावट जावक क्रमाकांकडे दुर्लक्ष करून हा प्रस्ताव मंजूर करून धुमाळ यांना सुधारित मान्यता देऊन वेतन अदा करून शासनाची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले. याविषयी पाटील यांनी शिक्षणाधिकारी कार्यालय आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयांत तक्रार केली. मात्र, त्यांनी या फसवणूक प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने याविषयी त्यांनी वेदांतनगर ठाण्यात तक्रार केली.

न्यायालयाच्या आदेशावरून नोंदविला गुन्हाया प्रकरणात पोलिसांनी तक्रारदार यांच्या अर्जावर कारवाई न केल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने पाटील यांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवून तपास करण्याचे निर्देश वेदांतनगर पोलिसांना दिले. पोलिसांनी गुरुवारी पाटील यांची तक्रार नोंदवून घेत आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६८, ४७१,(३४) नुसार गुन्हा नोंदविला. सपोनि-कंकाळ तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद