पाण्याच्या शोधात कोल्हा पडला विहिरीत
By Admin | Updated: May 23, 2016 23:31 IST2016-05-23T23:27:33+5:302016-05-23T23:31:57+5:30
अंभोरा : दुष्काळामुळे नदी, नाले, विहिरी व इतर जलस्रोत कोरडेठाक पडल्यामुळे वन्यप्राण्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. पाण्याच्या शोधात असलेला कोल्हा आष्टी तालुक्यातील साकत येथे रविवारी विहिरीत पडला.

पाण्याच्या शोधात कोल्हा पडला विहिरीत
अंभोरा : दुष्काळामुळे नदी, नाले, विहिरी व इतर जलस्रोत कोरडेठाक पडल्यामुळे वन्यप्राण्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. पाण्याच्या शोधात असलेला कोल्हा आष्टी तालुक्यातील साकत येथे रविवारी विहिरीत पडला. नागरिकांच्या सतर्कतेने कोल्ह्याचे प्राण वाचले.
साकत (ता. आष्टी) येथील मारूती गोविंद शिंदे यांच्या विहिरीत ४ ते ५ वर्षे वयाचा कोल्हा पडला. ही बातमी गावात कळताच बापू शिंदे यांनी कडा वनपरिक्षेत्राचे वनपाल बी.एन.वारे हे वनमजूर वाय.आर.शेख, वनमजूर ए.डी. पाथरकर, शेख सलीम, जगताप एस.एस. यांना घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचले. बापू शिंदे, पोपट गुंड , मारूती शिंदे, नाना भोगाडे, पप्पू थोरात, रवींद्र शिंदे , आकाश शिंदे या गावातील नागरिकांच्या मदतीने त्यांनी कोल्ह्यास बाजेवर बसवून विहिरीबाहेर अलगद काढले. त्यानंतर कोल्ह्यास रानात सोडून दिले. नागरिक व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कमुळे कोल्हा सुखरूप बचावला आहे.
या घटनेनंतर वन्यजीवासाठी कार्य करणारे शिवाजी विधाते यांनी साकत येथे पाणवठे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. (वार्ताहर)