शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षे उलटली तरी तपास शून्य

By admin | Updated: April 17, 2016 01:31 IST

औरंगाबाद : अख्ख्या औरंगाबादला हादरवून सोडणाऱ्या श्रुती विजय भागवत (४६) यांच्या खुनाचे गूढ उलगडण्यात तब्बल चार वर्षांनंतरही पोलिसांना यश आले नाही.

औरंगाबाद : अख्ख्या औरंगाबादला हादरवून सोडणाऱ्या श्रुती विजय भागवत (४६) यांच्या खुनाचे गूढ उलगडण्यात तब्बल चार वर्षांनंतरही पोलिसांना यश आले नाही. स्थानिक पोलीस अजूनही अंधारातच चाचपडत आहेत. अधिकृत नाही; पण अनधिकृतपणे पोलिसांनी या प्रकरणाची ‘फाईल’ जवळपास बंद केल्यासारखेच चित्र आहे. चार वर्षांमध्ये इंचभरही तपास पुढे न सरकल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांचा पोलिसांवरील विश्वास संपला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता सीआयडीकडे सोपविण्याची मागणी श्रुती भागवत यांचे भाऊ मुकुल करंदीकर यांनी केली आहे.मुकुल करंदीकर (रा. अहमदाबाद, गुजरात) हे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेण्यासाठी औरंगाबादला आले आहेत. शनिवारी सायंकाळपर्यंत त्यांची पोलीस आयुक्तांशी भेट झाली नव्हती. १८ एप्रिल २०१२ रोजी उल्कानगरीतील श्रीनाथ अपार्टमेंटमध्ये तळमजल्यातील फ्लॅट क्रमांक १ मध्ये पहाटे ३.५० वाजता धूर निघत असल्याची माहिती जवाहरनगर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून तत्कालीन पोलीस निरीक्षक एम.एस. वराडे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा श्रुती भागवत यांचा मृतदेह गादीत गुंडाळून पेटवून दिल्याचे स्पष्ट झाले होते. डोक्यात कुदळ, फावडे यासारख्या अवजाराने मारून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. खून आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला पोलिसांनी पाच पथके तयार करून सर्व बाजूंनी तपास केला. दरोडा घालण्यासाठी आलेल्या चोरट्यांनीच खून केला असावा, असा अंदाज पोलिसांनी बांधला; परंतु घरातून काहीही चोरीला गेले नाही, असे तपासात उघड झाले होते. नंतर जवळच्याच कोणीतरी हा खून केला असावा, अशी शंकाही पोलीस खाजगीत वर्तवित होते; परंतु पोलिसांचे हात शेवटपर्यंत रिकामेच राहिले. पुढे या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. मात्र, त्यानंतरही पोलिसांना यश आले नाही. सुरुवातीला दीड ते दोन महिने पोलीस श्रुती भागवत यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात होते. तपासातील कोणत्याही मुद्यांबाबत ते चर्चा करीत असत. मात्र, त्यानंतर अद्यापपर्यंत पोलिसांनी संपर्क साधला नाही. तपास सुरू आहे की नाही, याबाबत त्यांनी काहीही कळविले नाही. सध्या या प्रकरणाचा तपास नेमका कोणाकडे आहे याचीही माहिती आमच्याकडे नाही, अशी खंत करंदीकर यांनी बोलून दाखविली.