शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
3
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
4
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
5
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
6
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
7
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
8
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
9
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
10
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
11
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
12
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
13
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
15
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
16
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
17
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
18
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
19
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
20
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा

संशोधकांच्या आठशे जागांसाठी चार हजार इच्छुक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 3:43 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पेट-४ च्या परीक्षेत पात्र उमेदवारांकडून संशोधन आराखडे मागविण्यात आले आहेत. विविध विद्याशाखांमधून तब्बल ३,९३० विद्यार्थ्यांनी संशोधन आराखडे सादर केले. मात्र सर्व विषयांमध्ये मिळून केवळ ८६६ जागा उपलब्ध आहेत. यामुळे अनेकांना संशोधन करण्याची संधी मिळणे दुरापास्त झाले आहे. 

ठळक मुद्देविद्यापीठाने जून २०१६ मध्ये पीएच. डी. प्रवेश परीक्षेसाठी (पेट) अर्ज मागविले होते. तेव्हापासून आतापर्यंत ही प्रक्रिया सुरूच आहे.मुदतीपर्यंत चार विद्याशाखेंतर्गत तब्बल ३,९३० विद्यार्थ्यांनी संशोधन आराखडा दाखल केला आहे. 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पेट-४ च्या परीक्षेत पात्र उमेदवारांकडून संशोधन आराखडे मागविण्यात आले आहेत. विविध विद्याशाखांमधून तब्बल ३,९३० विद्यार्थ्यांनी संशोधन आराखडे सादर केले. मात्र सर्व विषयांमध्ये मिळून केवळ ८६६ जागा उपलब्ध आहेत. यामुळे अनेकांना संशोधन करण्याची संधी मिळणे दुरापास्त झाले आहे. 

विद्यापीठाने जून २०१६ मध्ये पीएच. डी. प्रवेश परीक्षेसाठी (पेट) अर्ज मागविले होते. तेव्हापासून आतापर्यंत ही प्रक्रिया सुरूच आहे. विद्यार्थी संशोधनासाठी कन्फर्मेशन मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह अनुभव, सेट-नेट आणि एम. फिल. याद्वारे पात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून संशोधन आराखडा मागविला होता. मुदतीपर्यंत चार विद्याशाखेंतर्गत तब्बल ३,९३० विद्यार्थ्यांनी संशोधन आराखडा दाखल केला आहे. या संशोधन आराखड्याची छाननी ५ फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. तर ६ व ७ फेब्रुवारी रोजी पात्र, अपात्र संशोधन आराखड्यांच्या याद्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित होतील, असे विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे यांनी सांगितले.

या संशोधन आराखड्याचे सादरीकरण २० ते २४ फेब्रुवारीदरम्यान ठेवण्यात येणार आहे. सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पडल्यास उपलब्ध जागा आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना संशोधनासाठीचे कन्फर्मेशन १५ मार्चपर्यंत देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. तसेच ज्या पात्र प्राध्यापकांना गाईडशिप अद्याप मिळालेली नाही, त्यांना तात्काळ गाईडशिप देण्याची प्रक्रियाही राबविण्यात येणार असल्याचेही डॉ. सरवदे यांनी स्पष्ट केले.

विद्याशाखा                      उपलब्ध जागा    विद्यार्थीविज्ञान व तंत्रज्ञान                         ५७२    १३७५सामाजिकशास्त्रे                             १५५    १४०९वाणिज्य व व्यवस्थापन                  ९७    ३३४आंतरविद्याशाखा                              ४२    ८१२एकूण                                            ८६६    ३९३० 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीTeacherशिक्षक