शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

चार लाखांचे रेशनचे धान्य जप्त

By admin | Updated: August 12, 2015 00:58 IST

नळदुर्ग : रेशन मालाचा काळा बाजार करण्यासाठी साठवून ठेवलेल्या जवळपास चार लाख किंमतीचे रॉकेल, गहू व तांदूळ यावर छापा टाकल्याची घटना

नळदुर्ग : रेशन मालाचा काळा बाजार करण्यासाठी साठवून ठेवलेल्या जवळपास चार लाख किंमतीचे रॉकेल, गहू व तांदूळ यावर छापा टाकल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील ईटकळ शिवारात पाझर तलावाजवळ घडली.अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली घाडगे यांना मिळालेल्या माहितीनुसार उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खांडवे, तुळजापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे व नळदुर्गचे सपोनि फुलचंद मेंगडे यांनी फौजफाट्यासह ईटकळपासून दोन किमी अंतरावर असलेल्या पाझर तलावाजवळील शेडमध्ये छापा टाकला. त्यावेळी तेथे रेशनचे अडीचशे लिटरचे ४५ बॅरल निळे रॉकेल आढळून आले. याबरोबरच दीडशे ते दोनशे पोती गहू व तांदूळ (पन्नास किलो वजनाचा माल) मिळून आला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळाचा पंचनामा, नमुने तपासणी व वजन करीत होते. याप्रकरणी तुळजापूर तालुक्यातील एका मुख्य विक्रेत्याच्या दोन मुलाला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. सुमारे चार लाख रुपये बाजार किंमतीचा रेशनमालाचा साठा काळा बाजार करण्यासाठी ठेवण्यात आल्याचे उघड झाल्याने परिसरातील स्वस्त धान्य दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात अनेक रिटेल रॉकेल विक्रेते, स्वस्त धान्य दुकानदार व गोडाऊन किपर समोर येण्याची शक्यता असून, हा काळा बाजार अनेक महिन्यापासून प्रसंगी वर्षापासून सुरू असावा, असा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली घाडगे म्हणाल्या की, या प्रकरणी आज गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार ही कार्यवाही करण्यात आलेली असून, सदरील छाप्यात सापडलेल्या मालाचे वजन व मूल्य अद्याप ठरविण्यात आलेले नाही. (वार्ताहर)मागील सात-आठ महिन्यापूर्वी जिल्ह्यात शहरी, ग्रामीण भागात रेशनच्या धान्याचा मोठा तुटवडा झाला होता़ अनेक ठिकाणी धान्य असतानाही मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या़ त्यातच ईटकळ येथे पोलिसांनी लाखो रूपयांचे धान्य, रॉकेल जप्त केल्याने रेशन तस्करीच्या चर्चेला ऊत आला आहे़ त्यामुळे महसूल प्रशासनाने शहरी, ग्रामीण भागातील रेशनच्या मालाची वेळोवेळी तपासणी करून दोषींवर सक्त कारवाई करावी, अशी मागणी लाभधारकांमधून केली जात आहे़