शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
2
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

चार कुख्यात दरोडेखोर जेरबंद

By admin | Updated: September 14, 2014 00:22 IST

पाचोड : कोंबिंग आॅपरेशन करून चार कुख्यात दरोडेखोरांनाअटक केली

पाचोड : पैठण तालुक्यातील खंडाळा, सालवडगाव शिवारात पारधी वस्तीवर पाचोड पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस, दरोडा प्रतिबंधक पथक आदी पथकाने या शिवारात शुक्रवारी सायंकाळी कोंबिंग आॅपरेशन करून फिल्मी स्टाईलने पाठलाग करून चार कुख्यात दरोडेखोरांना मोठ्या शिताफीने अटक केली आहे. हे थरारनाट्य सहा तास चालले. शकीन मोमीन चव्हाण (रा. सालवडगाव), भेद्या भुऱ्या भोसले, अमोल बाबुराव पवार , शारेस विठ्ठल काळे (सर्व रा. रहाटगाव, ता. पैठण) अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. पाचोड पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीवरून पाचोड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीने फोन करून पाचोड परिसरात वडजी, खंडाळा, सालवडगाव शिवारात दरोडेखोर आल्याची माहिती दिली. यानंतर पाचोड पोलिसांनी खात्री केली. नंतर सहायक पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांना माहिती दिली. यावेळी अनिल कुंभारे यांनी सहायक पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, फौजदार आर.डी. खुणे, फौजदार संपत पवार, जमादार संतोष सोनवणे, प्रभाकर शेळके, रमेश धस, शिवानंद बनगे, काशीनाथ लुटे, सौदागर सावंत, हनुमान धनवे, स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार दीपक सरोदे, जमादार नीलेश गायकवाड, शेख जावेद, संदीप घुनावत, दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे, जमादार शेख कासीम, महेश माळी, अशोक थोरात आदींचे पथक तयार केले.या पथकाने खंडाळा, सालवडगाव शिवारात सापळा रचला; मात्र दरोडेखोरांना पोलिसांची चाहूल लागताच दरोडेखोर पळून जात होते. या पथकाने त्यांना झडप घालून पकडले. शकीन मोमीन चव्हाण, भेद्या भुऱ्या भोसले, अमोल बाबुराव पवार, शारेस विठ्ठल काळे यांना अटक केली.यावेळी सहायक पोलीस निरीक्षक भगवान धबडगे म्हणाले की, यातील दरोडेखोरांनी नांदर शिवारात व नानेगाव शिवारात दोन ठिकाणी मारहाण करून लुटले आहे. आणखी बीड, उस्मानाबाद, अहमदनगर, जिल्ह्यात गुन्हे केलेले आहेत.याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या पथकाने खाजगी वाहने, मोटारसायकलचा वापर केल्यामुळे हा छापा यशस्वी झाल्याची माहिती धबडगे यांनी दिली.