माजी आमदार तेजस्विनी जाधव यांची सुनेविरुद्ध पोलिसांत धाव; सून भाजपा नेेते रावसाहेब दानवेंची कन्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 04:22 IST2020-03-13T04:20:52+5:302020-03-13T04:22:07+5:30

तेजस्विनी रायभान जाधव या समर्थनगर येथे मुलगा हर्षवर्धन, सून संजना, नातवांसह राहतात. हर्षवर्धन यांचे पत्नीसोबत पटत नाही.

Former MLA Tejaswini Jadhav runs into police against Sune | माजी आमदार तेजस्विनी जाधव यांची सुनेविरुद्ध पोलिसांत धाव; सून भाजपा नेेते रावसाहेब दानवेंची कन्या

माजी आमदार तेजस्विनी जाधव यांची सुनेविरुद्ध पोलिसांत धाव; सून भाजपा नेेते रावसाहेब दानवेंची कन्या

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष माजी आ. हर्षवर्धन जाधव यांच्या घरातील वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. सून संजनाने शिवीगाळ करून धमकावल्याची तक्रार त्यांच्या आई माजी आ. तेजस्विनी जाधव यांनी गुरुवारी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात नोंदविली. संजना या भाजप नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. याप्रकरणी संजनाविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.

तेजस्विनी रायभान जाधव या समर्थनगर येथे मुलगा हर्षवर्धन, सून संजना, नातवांसह राहतात. हर्षवर्धन यांचे पत्नीसोबत पटत नाही. मात्र, घरातील वाद पोलीस ठाण्यापर्यंत जाईल, असे कुणालाही वाटले नव्हते. तेजस्विनी जाधव यांनी गुरुवारी दुपारी क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठून सून संजना यांनी घरगुती कारणावरून शिवीगाळ केली आणि वाटोळे करीन, अशी धमकी दिल्याची तक्रार नोंदविली. सुनेने दिलेल्या धमकीमुळे जीवन जगणे असह्य झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले.

Web Title: Former MLA Tejaswini Jadhav runs into police against Sune

टॅग्स :Policeपोलिस