शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठी पायपीट

By admin | Updated: June 25, 2014 00:38 IST

कंधार : प्रवेश प्रक्रिया गतिमान झाली आहे़ शाळा- महाविद्यालय व स्वत:चा कार्यभार पूर्ण व्हावा, यासाठी शिक्षकांची विद्यार्थ्यांसाठी शहरासह ग्रामीण भागात मोठी पायपीट होत असल्याचे चित्र समोर आले आहे़

कंधार : प्रवेश प्रक्रिया गतिमान झाली आहे़ शाळा- महाविद्यालय व स्वत:चा कार्यभार पूर्ण व्हावा, यासाठी शिक्षकांची विद्यार्थ्यांसाठी शहरासह ग्रामीण भागात मोठी पायपीट होत असल्याचे चित्र समोर आले आहे़दहावी व बारावी बोर्डाचे निकाल लागले़ शासनमान्य खाजगी शिक्षण संस्थेचा निकाल वरचढ राहिला़ विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत आपली चुणूक दाखवली़ बारावी बोर्डात मुलींचा उत्तीर्णमध्ये टक्का वाढला़ शालांत परीक्षेचा निकालही चांगला लागला़ बारावी परीक्षेत मुलींचे उत्तीर्ण प्रमाण ९०़३० तर मुलांचे प्रमाण ८७़८९ टक्के होते़ एकूण निकाल ८८़६४ टक्के लागला़ दहावी परीक्षेचा सरासरी निकाल ७३़९९ टक्के लागला़ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी निकालाचे, उज्ज्वल यश परंपरेचे, आपल्या येथील खास अध्यापन वैशिष्ट्यांचा गवगवा करण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही़ आमच्या शाळेत असलेल्या शैक्षणिक सोयी-सुविधा, गुणवत्ता वाढीसाठी केले जाणारे प्रयत्न विद्यार्थ्यांकडे दिले जाणारे विशेष शैक्षणिक लक्ष, समस्यांवर मात करण्याचा होणारा प्रयत्न, उपलब्ध भौतिक सुविधा, कला, सांस्कृतिक, क्रीडा नैपुण्यासाठी प्रयत्न आदी पालकावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि विद्यार्थ्यांना जिभेवर साखर टाकल्यासारखे बोलले जात आहे़ पहिली, पाचवी, आठवी, अकरावी व पदवी स्तरावरील प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी गुरुजींनी मोठा आटापिटा चालविला आहे़ गावे-वाडीतांडे आडमार्गाला आहेत़ तरीही त्याला (गावाला) गाठण्यासाठी कोणतीही कसर ठेवली जात नाही़(वार्ताहर) गुणवंतांचा सत्कारनांदेड : राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा नांदेडच्या वतीने समाजातील दहावी व बारावीतील गुणवंतांचा सत्कार १३ जुलै रोजी गुरू रविदास महाराज मंदिर शिवनगर येथे होणार आहे़ ज्या विद्यार्थ्याला ८० टक्केच्यावर गुण मिळाले अशांनी गुणपत्रिकेसह संपर्क साधावा असे शहराध्यक्ष शिवानंद जोगदंड यांनी सांगितले़(वार्ताहर)शालांत परीक्षेत जि़प़ (मुलींचे) शाळा, कंधारचा निकाल शून्य टक्के लागला़ बारावी परीक्षेतील मुलींची यशस्वी भरारी असताना जि़प़ मुलींच्या शाळेच्या निकालाने अंतर्मुख करण्यास भाग पाडले़ तरीही नव्या उमेदीने सर्व शाळांतील शिक्षकांनी आपल्या शाळेत प्रवेशासाठी कंबर कसली आहे़ त्यासाठी गल्लीत, गावो-गाव शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात आहेत़