शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

चारा,पाण्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: August 17, 2014 00:31 IST

हिंगोली : जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण झाल्याने पशूपालकांनी जनावरांना कसायाच्या दावणीला बांधण्यास सुरूवात केली.

हिंगोली : पैशांपायी नगदी पिके घेण्याचा कल वाढल्यामुळे चारावर्गीय पिकांकडे साफ दुर्लक्ष झाले असताना यंदा पाऊस लांबला. परिणामी जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण झाल्याने पशूपालकांनी जनावरांना कसायाच्या दावणीला बांधण्यास सुरूवात केली. शिवाय खरीप हंगामातही ज्वारी आणि मक्याचे क्षेत्र घटल्याने भविष्यात चाराटंचाईचा प्रश्न भेडसावणार आहे. दुसरीकडे पावसाळ्यात ३५ विंधन विहिरीचे प्रस्ताव आल्याने पाणी टंचाईने रौद्ररूप धारण करण्यास सुरूवात केली. परिणामी चारा व पाण्याच्या नियोजनासंदर्भात शनिवारी अप्पर जिल्हाधिकारी राम गगरानी यांनी बैठक घेतली. जिल्ह्यात दीड महिन्यांच्या उशिराने दाखल झालेल्या पावसात सातत्य नाही. अद्यापही एकही नदी, नाला, ओढा वाहिला नसल्याने चारा आणि पाणीटंचाईने डोके वर काढले. आजघडीला २ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू असताना ३५ विंधन विहिरीचे प्रस्ताव आले आहेत. अद्याप पावसाळाही सरला नसताना धरणांत पुरेसे पाणी उपलब्ध नाही. पाणीपुरवठ्याच्या बहुतांश योजना बंद असताना काही ठिकाणी महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरलेला नाही. लवकर पाऊस न झाल्यास गावागावात पाणीटंचाईने ग्रामस्थांची भटकंती वाढेल. आजही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना चाऱ्यापायी पशूपालकांनी जनावरांना बाजार दाखवण्यास सुरूवात केली.गतवर्षी खरिपात अतिवृष्टी आणि रबी हंगामात अवकाळी पावसाने चाराच नष्ट झाल्याने यंदा चाराटंचाई उद्भवली. यंदाच्या खरीपात चारावर्गीय पिकांना उत्पादकांनी नाकारले. ४४ हजार ८९० पैकी १२ हजार हेक्टवर ज्वारी आणि केवळ १ हजार हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली. या क्षेत्रावरील पिकांचा चारा साडेचार लाख जनावरांची भूक भागविणारा नाही. आताच चाराटंचाईने पशुपालक हैराण असताना भविष्यात जनावरांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)