छत्रपती संभाजीनगर : सुरतवरून शहरासह अन्य जिल्ह्यांत नशेच्या गोळ्या व पातळ औषधांचा पुरवठा करणारा छावणीतील चांदमारी परिसरातील तरुण असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने सखोल तपास करत अजमत अहमद बेग (२४, रा. सुभाषनगर) याच्या मुसक्या आवळल्या, तर त्याला औषधांचा साठा विकणारा मेडिकल चालक रमेश गोमाराम चौधरी (३५, रा. पालनपूर गाव, सुरत) यालाही अटक करून शहरात आणण्यात आले.
सातत्याने अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई होऊनही शहरात नशेच्या गोळ्या व पातळ औषधींची विक्री सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने छावणीतील कुख्यात गुन्हेगार सय्यद फिरोज ऊर्फ अंध सय्यद अकबर (३०) याचा सख्खा भाऊ सय्यद अझहर सय्यद अकबर (रा. चांदमारी, छावणी) व त्याच्या टोळीचा सदस्य तौफिक रशीद अली (२४, रा. चांदमारी, कश्मीर मोहल्ला, छावणी) यांना अटक केली. दोघांकडून एकूण ४४०० गोळ्या व १३२ पातळ औषधांच्या बाटल्या, असा एकूण १९ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. दोघांनी गेल्या आठवड्यात सुरतवरून हा मुद्देमाल आणल्याची कबुली दिली. त्यानंतर अधीक्षक अजित टिके, उपअधीक्षक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी मुख्य पुरवठादाराचा शोध सुरू केला होता.
महिला तस्करासोबत थाटला संसार-गेल्या अनेक वर्षांपासून अमली पदार्थांच्या रॅकेटमध्ये आयेशा नामक महिलेचे नाव समोर येत आहे. तिच्यावर क्रांती चौक व जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मात्र, शहर पोलिसांकडून तिच्या अटकेसाठी प्रयत्न झाले नाहीत.
-टास्क फोर्सने तीन दिवसांपूर्वी सुरतला जाऊन तिचा शोध सुरू केला. तेव्हा तिच्यासोबत राहत असलेला अजमत हाती लागला. अजमत हा मूळ छावणीतील चांदमारी परिसराचा रहिवासी असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांना धक्का बसला.-२०२१ मध्ये अजमत कामानिमित्त सुरतला गेला. तेथे त्याने आयेशा नामक महिला तस्करासोबत संसार थाटून अमली पदार्थांची तस्करी सुरू केली. २०२३ मध्ये शहरात अंध फिरोज प्रकरणात त्यालाही सहआरोपी करण्यात आले होते.
५०-६० रुपयांची बाटली शहरात ४०० रुपयांनाअजमतला औषधांचा साठा विकणारा सुरतच्या पालनपूर येथील मेडिकल चालक रमेश चौधरी यालाही टास्क फोर्सने अटक केली. मूळ राजस्थानचा असलेल्या रमेशने नशेसाठी औषधांचा पुरवठा सुरू करून मोठी कमाई केली. जवळपास ५० ते ६० रुपयांना विक्री होणारी बाटली शहरात स्थानिक तस्करांकडून ४०० रुपयांपर्यंत विकली जाते.
ब्लॅक मार्केटमधून खरेदी अन् विक्रीअजमत व चौधरी कंपनीतून साठा बाहेर पडताच ब्लॅक मार्केटमध्ये गोळ्या व बाटल्यांची बिलाशिवाय विक्री करतात. आवश्यकतेनुसार खोटी बिलेही तयार करतात. न्यायालयाने आरोपींना १ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सहायक निरीक्षक विजय जगदाळे, दीपाली पाटील, विश्वास शिंदे, अंमलदार रवींद्र साळवे, नितीन जाधव, साईनाथ आगीवाले, सतीश पाटील, अतुल तुपे, राहुल काळे, सूरज जोनवाल, हरीश मुंढे, अमित ठाकूर, ज्ञानेश्वर शेलार, ज्योती कीर्तीकर, आम्रपाली सूर्यवंशी, प्रियंका पवार यांनी कारवाई पार पाडली.
Web Summary : Drug racket busted in Sambhaji Nagar; Surat link exposed. A local youth from Chhaoni orchestrated the supply of drugs, including pills and liquid substances, across districts. Police arrested the mastermind and his Surat-based supplier.
Web Summary : संभाजी नगर में ड्रग्स रैकेट का भंडाफोड़; सूरत कनेक्शन उजागर। छावनी का एक स्थानीय युवक जिलों में नशीली दवाओं, गोलियों और तरल पदार्थों की आपूर्ति का आयोजन करता था। पुलिस ने मास्टरमाइंड और उसके सूरत स्थित आपूर्तिकर्ता को गिरफ्तार किया।