शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाईन’चे पाच संशयित दाखल

By admin | Updated: March 28, 2015 00:42 IST

उस्मानाबाद : उन्हाचा पारा ४० अंशावर गेल्याने स्वाईन फ्लूचा प्रभाव कमी होईल, अशी आशा फोल ठरताना दिसत आहे़

उस्मानाबाद : उन्हाचा पारा ४० अंशावर गेल्याने स्वाईन फ्लूचा प्रभाव कमी होईल, अशी आशा फोल ठरताना दिसत आहे़ जिल्हा रूग्णालयात गुरूवारी व शुक्रवारी स्वाईन फ्लू संशयित म्हणून पाच जण दाखल झाले आहेत़ तर गंभीर प्रकृती असलेल्या दोन महिलांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत़फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभीपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या स्वाईन फ्लूचा जिल्ह्यात झालेला फैलाव अद्यापही कमी होताना दिसत नाही़ या आजाराने आजवर जिल्ह्यात सात जणांचे बळी घेतले आहेत़ तर पॉझिटीव्ह रूग्ण आढळलेल्या चौघांची प्रकृती सुधारली आहे़ जिल्हा रूग्णालयात आजवर एकूण ५८ रूग्ण संशयित म्हणून उपचारासाठी दाखल झाले आहेत़ यामध्ये गुरूवारी उकडगाव (ता़बार्शी) येथील एक ५४ वर्षीय महिला, सोनेगाव येथील एक ४५ वर्षीय महिला दाखल झाली आहे़ या दोघींचे स्वॅब घेवून तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत़ तर शुक्रवारी तिघे संशयित रूग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत़ यात अनसुर्डा येथील एक ६० वर्षीय वृद्ध, उस्मानाबाद शहरातील सांजा चौक येथील एक ५७ वर्षीय इसम व शहरातीलच जुना बसडेपो भागातील एक ५८ वर्षीय इसम उपचारासाठी दाखल झाला आहे़ या सर्वांवर उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले़ (प्रतिनिधी)