शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

गोठा प्रस्तावाच्या मंजुरीसाठी पाच सदस्यांचा सभात्याग

By admin | Updated: July 6, 2014 00:24 IST

कळंब : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील जनावरांच्या गोठ्यांचे हजारो प्रस्ताव गत दोन वर्षांपासून कळंब पंचायत समितीमध्ये मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

कळंब : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील जनावरांच्या गोठ्यांचे हजारो प्रस्ताव गत दोन वर्षांपासून कळंब पंचायत समितीमध्ये मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. अखेर आज यासंदर्भात पं.स. सदस्यांना जाग आली असून, शेतकऱ्यांच्या गोठ्याच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच सदस्यांनी शनिवारी मासिक सभेतून सभात्याग केला.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून पशुधनाच्या निवाऱ्याची पक्की सोय व्हावी, याकरिता पशुधनासाठी व शेळीपालन, कुक्कटपालन शेडसाठी निधी देण्यास दोन वर्षापूर्वी अनुमती देण्यात आली. त्यानुसार या कामाचा नाविण्यपूर्ण अनुज्ञेय कामाच्या यादीत समावेश करण्यात आला. पशुधनाच्या आरोग्यासाठी हितकर ठरणाऱ्या या कामाचे हजारो प्रस्ताव कळंब पंचायत समितीकडे मंजुरीस्तव तालुक्यातील शेतकऱ्यांनी दाखल केले होते.
सदर प्रस्ताव ग्रामपंचायतने पंचायत समितीस सादर करायचे, पंचायत समितीच्या रोहयो कक्षानी छाननी करुन सदर प्रस्ताव पंचायत समितीच्या पशुधन विस्तार अधिकाऱ्याकडे तांत्रिक मान्यतेस्तव पाठवायची, तांत्रिक मान्यता आल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी त्यास प्रशासकीय मान्यता देवून संबंधित कार्यान्वये यंत्रणा असलेल्या ग्रामपंचायतला कार्यारंभ आदेश द्यायचा, असा या गोठ्याच्या प्रस्तावाची कार्यालयीन प्रक्रिया संपूर्णत: पंचायत समितीच्या कार्यकक्षेत आहेत. असे असतानाही कळंब पंचायत समितीमध्ये गत दोन वर्षात शेतकऱ्यांच्या या प्रस्तावावरील धूळ झडकण्याची तसदी संबंधितांनी घेतली नाही. यामुळे हजारो प्रस्ताव लालफितशाहीमध्ये अडकले होते.
शनिवारी कळंब पंचायत समितीमध्ये सदस्याची मासिक बैठक होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पं.स. सदस्य अ‍ॅड. प्रवीण यादव, बाळासाहेब बोंदर, डी.वाय. कांबळे, आरेफा बागवान, मनकर्णा सरवदे यांनी वारंवार मागणी करुनही शेतकऱ्यांच्या या गोठ्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळत नसल्याचा विषय काढून सभात्याग केला. यासंदर्भात या सदस्यांनी एक पत्र गटविकास अधिकाऱ्यांनाही दिले असून, जिल्ह्याला पशुसंवर्धन खात्याचे मंत्री असतानासुद्धा शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या गोठ्याचा प्रश्न मार्गी लागला नसल्याचा आरोप केला आहे. (वार्ताहर)
१४ तारखेला बोेंबाबोंब आंदोलन
दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रलंबित गोठ्याच्या प्रस्तावांना मान्यता न दिल्यास १४ जुलैला कळंब पंचायत समितीसमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा अ‍ॅड. प्रवीण यादव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पं.स. सदस्यांनी दिला आहे. यासंदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन पं.स. सदस्य अ‍ॅड. प्रवीण यादव यांनी केले आहे.