शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

ब्रिटिशांनंतर ‘स्वामित्व’ योजनेच्या माध्यमातून पहिल्यांदाच होणार गावठाण पाहणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 6:07 PM

२ आॅक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील काही ग्रामीण मालमत्तांना प्रतीकात्मक ई-प्रॉपर्टी कार्ड देऊन योजनेचे उद्घाटन करण्यात येणार आहे

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्यातील २५ गावांची ई-प्रॉपर्टी कार्डसाठी पाहणी कर्नाटक, महाराष्ट, हरयाणा राज्यात ड्रोनद्वारे गावठाण सर्व्हे होणार आहे.

- विकास राऊत 

औरंगाबाद : ब्रिटिश राजवटीत राज्यातील गावठाणांची पाहणी करण्यात आली होती. ब्रिटिशांनी देश सोडल्यानंतर पहिल्यांदाच राज्य शासनाने गावठाणांची पाहणी करून हद्द ठरविण्यासाठी आणलेली योजना केंद्र शासनाने ‘स्वामित्व’ (सर्व्हे ऑफ व्हिलेजेस अ­ॅण्ड मॅपिंग विथ इम्प्रोव्हाईस्ड टेक्नोलॉजी ईन व्हिलेज एरिया) या नावाने स्वीकारली असून, २ आॅक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील काही ग्रामीण मालमत्तांना प्रतीकात्मक ई-प्रॉपर्टी कार्ड देऊन योजनेचे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील २५ गावांचा या योजनेत समावेश झाला असून, पाहणीचे काम वेगाने सुरू आहे. 

कर्नाटक, महाराष्ट, हरयाणा राज्यात ड्रोनद्वारे गावठाण सर्व्हे होणार आहे. २ आॅक्टोबर रोजी दिल्लीतून योजनेचे प्रतीकात्मक उद्घाटन होईल. राज्यातील औरंगाबाद, पुणे, अहमदनगर, नागपूर मिळून १०६ गावांची पाहणी होणार आहे. जिल्ह्यात गतवर्षी या योजनेत ३ तालुक्यांचे काम हाती घेण्यात आले. दरम्यान, ड्रोनमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यातच निधीची कमतरता निर्माण झाली. इतर राज्यांमध्ये सुरुवात झाल्यानंतर त्यांच्याकडून आणलेले ड्रोन देण्यात आले. त्यामुळे ड्रोन येईपर्यंत पाहणी थांबविली असली तरी नव्याने स्वामित्व योजनेतील २५ गावांची पाहणी २ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. गावठाण मालमत्तांचे जीआयएस रेखांकन करणे, प्रत्येक घराचा नकाशा तयार करणे, खुली जागा व रस्त्याचा नकाशा तयार करणे. घर, खुली जागा, रस्ता, गल्ली, नाला यांना भूमापन क्रमांक देणे, ग्रामपंचायतीचे व शासनाचे अ­ॅसेट रजिस्टर तयार करणे. पाहणीची सर्व माहिती ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत देणे. तसेच या कामाची तांत्रिक मार्गदर्शक पुस्तिका तयार करण्याचा योजनेत समावेश आहे. 

 

ब्रिटिशांनंतर पहिल्यांदाच गावठाण पाहणी  1964 साली शासनाने राज्यातील गावठाणांना सर्व्हे क्रमांक दिले होते, त्याला ब्रिटिशांनी केलेल्या पाहणीचा आधार होता. त्यानंतर २ हजार लोकसंख्या असलेल्या गावांना नगर भूमापन क्रमांक देण्यात आले. 2000 लोकसंख्येवरील गावांना सज्जा निर्मिती करण्यात आली. राज्यातील ४० हजार गावांपैकी ४ हजार ६७९ गावांंची ९४ पर्यंत पाहणी केली. त्यानंतर तालुका पॅटर्न आले. जिल्ह्यात २ हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेली ८५३ गावे आहेत. औरंगाबाद तालुक्यातील १४४ गावे, कन्नड १५६, पैठण १५७, गंगापूर १८७, फुलंब्री ८०, खुलताबाद ६८, सिल्लोड ९८, वैजापूर १५० आणि सोयगाव तालुक्यातील ७५ गावांपैकी काही गावांतील गावठाणांची ड्रोनद्वारे पाहणी केली होती.

जिल्ह्यातील पाहणीसाठी  ८ कोटींचा खर्चजिल्ह्यातील १०८२ गावांतील गावठाणांवर प्रतिगाव ७५ हजार रुपयांप्रमाणे ८ कोटी ११ लाख ५० हजार खर्च होण्याचा अंदाज आहे. राज्यात पुणे व औरंगाबाद जिल्ह्यात पथदर्शी म्हणून हा प्रकल्प गावठाण पाहणीची योजना गेल्यावर्षी जुलै महिन्यात हाती घेण्यात आली होती. औरंगाबादेतील १ हजार ८२ गावांतील गावठाणांची पाहणी आधुनिक ड्रोनच्या साहाय्याने करण्याची मूळ योजना होती. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादRevenue Departmentमहसूल विभागState Governmentराज्य सरकार