कर्फ्यूच्या पहिल्याच रात्री डॉक्टरांचं घर फोडलं; १०० तोळे सोनं, १० लाखाची रोकड लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 13:49 IST2021-02-24T13:46:58+5:302021-02-24T13:49:06+5:30
Robbery in Pratap Nagar Aurangabad डॉ.सुषमा सोनी (रा.प्रतापनगर, उस्मानपुरा) आणि त्यांचे पती जयंत सोनी हे ८ दिवसापूर्वी परिवारासह देवदर्शनासाठी परराज्यात गेले आहेत.

कर्फ्यूच्या पहिल्याच रात्री डॉक्टरांचं घर फोडलं; १०० तोळे सोनं, १० लाखाची रोकड लंपास
औरंगाबाद: शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आल्याच्या पहिल्याच रात्री डॉक्टराचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी घरातील १०० तोळे सोने आणि दहा लाख रुपये रोख असा सुमारे 50 ते 70 लाखांचा मुद्देमाल चोरल्याची घटना आज सकाळी शहरातील प्रताप नगर भागात उघडकीस आली. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तासह अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. धाडसी चोरीने पोलिसांच्या रात्र गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
डॉ.सुषमा सोनी (रा.प्रतापनगर, उस्मानपुरा) आणि त्यांचे पती जयंत सोनी हे ८ दिवसापूर्वी परिवारासह देवदर्शनासाठी परराज्यात गेले आहेत. बंद घर असल्याची संधी साधत चोरट्यानी घराला लक्ष केले. घराचा समोरील दरवाजा तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. यानंतर घरामध्ये ठेवलेले सुमारे १०० तोळे सोन्याचे दागिने व रोख १० लाख रुपये असे सुमारे 60 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यानी लंपास केला आहे. आज सकाळी सोनी कुटुंबाचा नोकर अंगणातील झाडांना पाणी घालण्यासाठी आणि साफसफाई साठी आले तेंव्हा हा सर्व प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता,उपयुक्त निकेश खाटमोडे, उपयुक्त दीपक गिरऱ्हे सह गुन्हेशाखा आणि अन्य पोलीस ठाण्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी घटनस्थळी दाखल झाले आहेत...