शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये पहिले मराठा जात प्रमाणपत्र

By admin | Updated: July 24, 2014 00:40 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील पहिले मराठा जात प्रमाणपत्र मिळविण्याचा मान रामेश्वर भानुदास निकम या १९ वर्षीय अभियांत्रिकी पदविकाधारक युवकास मिळाला आहे

औरंगाबाद : जिल्ह्यातील पहिले मराठा जात प्रमाणपत्र मिळविण्याचा मान रामेश्वर भानुदास निकम या १९ वर्षीय अभियांत्रिकी पदविकाधारक युवकास मिळाला आहे. मराठा समाजाचा शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गात (ईएसबीसी) समावेश करून १६ टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा जात प्रमाणपत्राचे वितरण केले जात आहे. मराठा जात प्रमाणपत्राच्या एक हजारावर अर्जांची आतापर्यंत विक्री झाली असून, आज सहा जणांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षातील प्रवेशासाठी आरक्षणाचा लाभ रामेश्वरला यामुळे मिळणार आहे.शिक्षण व नोकऱ्यांसाठी मराठा समाजास १६ टक्के, तर मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्यातील आघाडी सरकारने घेतला होता. याबाबतचा अध्यादेश १५ जुलैला जारी करण्यात आला. अध्यादेश जारी केल्यानंतर लगेचच जात प्रमाणपत्रासाठी सेतू सुविधा केंद्रात विचारणा केली जात होती; परंतु याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले नव्हते. मराठा जात प्रमाणपत्रासाठीचे अर्ज, शपथपत्र तसेच जात प्रमाणपत्र यांचे नमुने त्यानंतर निश्चित करण्यात आले. या प्रक्रियेनंतर मराठा जात प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना १७ जुलै रोजी दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सहाव्या दिवशी म्हणजे २३ जुलै रोजी सेतू सुविधा केंद्रातून मराठा जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यास प्रारंभ झाला. अंबरवाडीकर्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदविका मिळविणाऱ्या रामेश्वर निकम यास मराठा जातीचे पहिले प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. भानुदास म्हस्के, शिवम म्हस्के, ऋषिकेश म्हस्के, वर्षा म्हस्के आणि संजय निकम या इतर पाच जणांना औरंगाबादचे उपविभागीय अधिकारी बप्पासाहेब थोरात यांच्या सहीने मराठा जात प्रमाणपत्र देण्यात आले. मराठा जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये खास शिबिरे घेतली जाणार आहेत. ‘अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्षाची प्रवेशप्रक्रिया सध्या राबविली जात आहे. अभियांत्रिकी द्वितीय वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणीची मुदत २८ जुलै रोजी संपणार आहे. या प्रवेशासाठी मराठा आरक्षणाचा लाभ मिळावा, या हेतूने मी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. आरक्षणामुळे मला थेट दुसऱ्या वर्षात निश्चित प्रवेश मिळेल,’ असे रामेश्वर निकम याने सांगितले.१९६७ चे पुरावे गरजेचे मराठा जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी संबंधितांना महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचे १९६७ चे पुरावे द्यावे लागणार आहेत. पंजोबा, आजोबा यांचे खासरा पत्र, वास्तव्याचे महसुली पुरावे, तसेच शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर हे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सध्या मराठा जात प्रमाणपत्राच्या एक हजारावर अर्जांची विक्री झाली असून, शंभरावर प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.