धावत्या बसमध्ये आग, चालकाच्या मदतीला प्रवासी-नागरिक धावल्याने अनर्थ टळला
By संतोष हिरेमठ | Updated: May 30, 2023 13:00 IST2023-05-30T12:59:40+5:302023-05-30T13:00:56+5:30
सुदैवाने वेळीच आग आटोक्यात आली. त्यामुळे ३५ प्रवासी बालम बाल बचावले.

धावत्या बसमध्ये आग, चालकाच्या मदतीला प्रवासी-नागरिक धावल्याने अनर्थ टळला
छत्रपती संभाजीनगर : सिल्लोडहून छत्रपती संभाजीनगरला येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला आग लागल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास दिल्ली गेट परिसरात घडली. सुदैवाने वेळीच आग आटोक्यात आली. त्यामुळे ३५ प्रवासी बालम बाल बचावले.
बसमधून मोठ्या प्रमाणात दूर येत होता. अशातच इंजिनच्या जागेत आग लागली. सुदैवाने वेळीच हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे बस तात्काळ जागेवर उभी करण्यात आली. प्रवाशांना तत्काळ खाली उतरविण्यात आले. त्यानंतर बसमधील अग्निशमन यंत्राने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. यासाठी अनेक नागरिक मदतीसाठी धावून आले.