शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ‘फायर ब्रिगेड’ पडतेय नागरिकांच्या रोषाला बळी..!

By admin | Updated: April 8, 2015 00:54 IST

बीड : आग लागली की, ताबडतोब अग्नीशमन दलाला पाचारण केले जाते, मात्र जिल्ह्यातील अग्नीशमन दलाची यंत्रणा अतिशय तोकडी असून अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरीकांच्या रोषाला

बीड : आग लागली की, ताबडतोब अग्नीशमन दलाला पाचारण केले जाते, मात्र जिल्ह्यातील अग्नीशमन दलाची यंत्रणा अतिशय तोकडी असून अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरीकांच्या रोषाला अधिकाऱ्यांना सामोरे जावेल लागत असल्याचे वास्तव आहे. आजही जिल्ह्यात ‘फायरमॅन’ सह चालक व अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे अग्नीशम यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे. जागतीक अग्निशन दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा आढावा.ग्रहमंत्रालय भारत सरकार अंतर्गत स्थायी अग्नीशमन मार्गदर्शक कमिटीच्या निर्देषानुसार अग्नीशमन दल चालते. ५० हजार लोकवस्तीला एक अग्नीशमन गाडी असावी, असे शासनाचे निर्देश आहेत, मात्र बीड शहराची संख्या अडीच ते तीन लाखाच्या आसपास आहे. यासाठी किमान सहा गाड्यांची आवश्यकता आहे. परंतू आज शहरासाठी केवळ तीनच गाड्या असून यासाठी केवळ दोन फायर मॅन आणि एक जमादार आहे. शासन निर्देशानुसार प्रत्येक गाडीवर एका पाळीला पाच फायरमॅन आणि ३ चालक असावे असा नियम आहे. शहरातील उपलब्ध गाड्यांच्या संख्येनुसार ४५ फायरमॅन आणि २७ चालकांची आवश्यकता आहे. परंतू आजही या ७२ लोकांचा कारभार केवळ तीन लोकांवर चालत असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ही स्थिती केवळ बीड शहराची नसून संपूर्ण बीड जिल्ह्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.