औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थी गेले पाच महिने विद्यापीठात ऑफलाईन वर्ग घेण्यात यावेत. यासाठी एफएसआयच्या वतीने विद्यार्थी विद्यापीठ आणि शासनाशी पत्रव्यवहार करत आहेत. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने बुधवारी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर प्रति अभ्यास वर्ग भरवला.
एसएफआयच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. राष्ट्रगीताने प्रति वर्गाची सुरुवात झाली. यावेळी प्रतिकात्मक अधिकाऱ्यांनी मते मांडली. पाचवी ते बारावीच्या शाळा सुरु झाल्या. मग विद्यापीठातील वर्ग का भरवण्यात येत नाहीत. असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. विद्यापीठ प्रशासन आणि शासन मागणी मान्य करणार नाही तोपर्यंत दररोज दुपारी तीन वाजता प्रति अभ्यासवर्ग भरवू, असे अमोल खरात, लोकेश कांबळे, दीक्षा पवार, रामेश्वर पाटील यांनी सांगितले. यावेळी अभ्यासिकेतील सर्व विद्यार्थी व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. ऑनलाईन अध्यापन बंद करून प्रत्यक्ष वर्ग भरवण्यात यावेत, महाविद्यालये सुरू करावीत, तत्काळ सर्व वसतिगृह सुरू करण्यात यावीत, अशा मागण्या केल्या. यावेळी सचिन बोराडे, पांडुरंग भुतेकर, रामेश्वर मुळे आदींची उपस्थिती होती.
---