शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पावणेसात कोटींच्या रस्ते, पूल दुरूस्तीला मंजुरी

By admin | Updated: July 5, 2014 00:46 IST

हिंगोली : जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टीने जिल्हा परिषदेतंर्गत येणाऱ्या रस्ते व पुलांचे नुकसान झाल्याने दुरूस्तीसाठी मिळालेल्या १० कोटी ७९ लाख रुपयांपैकी ७ कोटी ६९ लाख रुपयांच्या कामांना

हिंगोली : जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टीने जिल्हा परिषदेतंर्गत येणाऱ्या रस्ते व पुलांचे नुकसान झाल्याने दुरूस्तीसाठी मिळालेल्या १० कोटी ७९ लाख रुपयांपैकी ७ कोटी ६९ लाख रुपयांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील प्राधान्यक्रम समितीने मंजुरी दिली आहे. गतवर्षी जिल्ह्यात अतिवृष्टीने रस्ते व पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी जिल्हा परिषदेला काही महिन्यांपूर्वी १० कोटी ७९ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. मध्येच मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने या निधी खर्चाला मंजुरी मिळू शकली नव्हती. मराठवाडा पदवीधरची आचारसंहिता संपल्यानंतर गुरूवारी जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांच्या अध्यक्षतेखाली प्राधान्यक्रम समितीची बैठक झाली. बैठकीस जि. प. सीईओ पी. व्ही. बनसोडे, अतिरिक्त सीईओ अशोक सिरसे, जि. प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वाघमारे, उपअभियंता चंदाले आदींची उपस्थिती होती. बैठकीत जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या निधीवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये नुकसान झालेल्या पुलांच्या दुरूस्तीसाठी ५ कोटी ७९ लाख रुपये मंजूर झाले आहेत; परंतु दुरूस्तीसाठी २ कोटी ६९ लाख रुपये एवढाच निधी लागणार आहे. उर्वरित निधी रस्ता दुरूस्तींच्या कामावर खर्च करण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली; परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळली. उर्वरित ३ कोटी १० लाख रुपयांचा निधी रस्त्यांच्या कामावर खर्च करण्यासाठी राज्य शासनाची मंजूरी घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले. यावेळी रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी ५ कोटी रुपयांच्या निधीलाही समितीने मंजूरी दिली. त्यामुळे आता पुलांच्या दुरूस्तीसाठी आलेले उर्वरित ३ कोटी १० लाख रुपये खर्च करण्यासाठी शासनाचे मार्गदर्शन मागवावे लागणार आहे.(जिल्हा प्रतिनिधी)कामाच्या दर्जाविषयी शंकाचजिल्हा परिषदेत सध्या टक्केवारीचीच चर्चा सर्वत्र होताना दिसून येत आहे. रस्ते व पूल दुरूस्तीच्या कामातही टक्केवारी ठरलेलीच आहे. मंजूर निधीच्या जवळपास २५ ते ३० टक्क्यांपर्यंतची रक्कम टक्केवारी वाटपावरच संबंधित कंत्राटदाराला खर्च करावी लागते. त्यामुळे उरलेल्या निधीतून काम करणे व त्यातून नफा मिळविणे ही कंत्राटदारांसाठी तारेवरची कसरत होऊन बसली आहे. या कसरतीतून करण्यात येणाऱ्या कामाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात सापडतो. त्यामुळे रस्ते व पूल दुरूस्तीचे काम एक ते दीड वर्षांतच उघड्यावर येत असल्याच्या गेल्या काही महिन्यांमध्ये घटना समोर येत आहेत, हे विशेष!सदस्यांकडून निधी मिळविण्यासाठी रस्सीखेचजिल्हा परिषदेकडे १० कोटी ७९ लाख रुपये रस्ते व पूल दुरूस्तीसाठी प्राप्त झाले होते. त्यामुळे जि. प. तील पदाधिकाऱ्यांनी या निधीला प्रशासकीय मान्यता मिळण्यापूर्वीच आपसात खासगीरित्या निधी वाटून घेतला होता. आता या निधीपैकी ३ कोटी १० लाख रुपयांचा निधी रस्ता दुरूस्तीवर खर्च करण्यास शासनाची मंजुरी घ्यावी लागणार असल्याने सदस्यांचे आपसातील निधी वाटपातील गणित बिघडले आहे. त्यामुळे यावरून अंतर्गत वादही निर्माण होवू शकतो. आता निविदा प्रक्रिया सुरू होणारदरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ७ कोटी ६९ लाख रुपयांच्या रस्ते व पूल दुरूस्तीला मंजुरी दिल्याने आता निविदेची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे शुक्रवारपासून जिल्हा परिषदेत कामे मिळविण्यासाठी कंत्राटदारांची लगबग सुरू झाल्याचे दिसून आले.३ कोटी १० लाखांच्या निधीला वेळ लागणारजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ७ कोटी ६९ लाख रुपयांच्या निधी वितरणाला मंजुरी दिली असली तरी उर्वरित ३ कोटी १० लाख रुपयांच्या निधीला शासनाकडून मंजुरी मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेला बरीच कसरत करावी लागणार आहे. कारण पुल दुरूस्तीचा निधी रस्ता दुरूस्तीसाठी वापरावयाचा असल्याने सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांना मंत्रालयात वजन खर्ची करावे लागणार आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने पदाधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे.