शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

ताप, डोकेदुखी, अंगदुखी; मंकीपॉक्सची लक्षणे नाहीत ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 20:45 IST

घाबरू नका, खबरदारी घ्या : आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन

छत्रपती संभाजीनगर : मंकी पॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून संसर्गित रुग्ण २ ते ४ आठवड्यात बरा होतो. लहान मुलांमध्ये किंवा इतर काही रुग्णांमध्ये हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या दृष्टीने आरोग्य विभागाने ‘घाबरू नका... पण, खबरदारी बाळगा’ असे आवाहन नागरिकांना केले आहे.

मंकी पॉक्स या संसर्गजन्य आजाराचा प्रसार होऊ नये व झाल्यास तत्काळ उपाययोजना कराव्या, असे आरोग्य यंत्रणेने कळविले आहे. साधारणपणे, अंगावर अचानक पुरळ उठणे, लसिका ग्रंथी सुजणे, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, प्रचंड थकवा आदी लक्षणे दिसताच तत्काळ डॉक्टरांना दाखवावे व रक्ताची चाचणीही करून घेणे गरजेचे आहे.

सध्या जगातील विविध देशात ‘मंकी पॉक्स’ या विष्णूजन्य आजाराचा संसर्ग वाढत आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंकी पॉक्स संसर्गाचा वेग व तीव्रता कमी करण्याच्या अनुषंगाने वेळीच प्रतिबंध सर्वेक्षण व नियंत्रणाबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

मंकी पॉक्स म्हणजे काय ?मंकी पॉक्स हा आजार ‘ऑर्थोपॉक्स’ या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. साधारणतः अंगावर पुरळ उमटण्यापूर्वी एक ते दोन दिवसांपासून ते त्वचेवरील फोडावरील खपल्या पडेपर्यंत किंवा ते पूर्णपणे मावळेपर्यंत बाधित रुग्ण इतर व्यक्तीसाठी संसर्गजन्य असतो.

जिल्ह्याला अलर्टजिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या वतीने मंकी पॉक्स या विषाणूजन्य आजाराला आळा घालण्यासाठी प्रतिबंध सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत असून या आजाराविषयी ‘अलर्ट’ देण्यात आला आहे.

विलगीकरण आवश्यकसंशयित मंकी पॉक्स रुग्णाचे वेळीच विलगीकरण करण्याची दक्षता घ्यावी. जोपर्यंत रुग्णाच्या कातडीवरील पुरळ, फोड पूर्णपणे बरे होत नाहीत आणि त्यावरील खपल्या गळून जात नाहीत तोपर्यंत त्याला विलगीकरणात ठेवावे.

 काय काळजी घ्याल?रुग्णांच्या कपड्यांची अथवा अंथरुण-पांघरुणाशी अन्य व्यक्तीचा संपर्क येऊ देऊ नये. हातांची स्वच्छता राखावी, निकट सहवासीतांमध्ये २१ दिवस पाठपुरावा करावा, रुग्णास ताप आल्यास प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य