शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

कुपनलिकेचे पैसे वाया जाण्याची भीती

By admin | Updated: September 3, 2015 00:29 IST

लातूर : विंधन विहीर घेण्यासाठी २०० फुटांपर्यंतच परवानगी आहे़ त्यापुढील खोलीची विंधन विहीर घेण्यास परवानगी नाही़ पाणीपातळी खोल गेल्याने

लातूर : विंधन विहीर घेण्यासाठी २०० फुटांपर्यंतच परवानगी आहे़ त्यापुढील खोलीची विंधन विहीर घेण्यास परवानगी नाही़ पाणीपातळी खोल गेल्याने २०० फुटांपर्यंत पाणी लागेल याचा भरोसा नाही़ परिणामी बोअर पाडल्यास पैसे वाया जाण्याची भीती मनपाला भेडसावत आहे़ खास बाब म्हणून लातूर शहरात ४०० फुटांपर्यंत बोअर पाडण्याची परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ लातूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीने शंभर बोअर पाडण्याचे नियोजन केले आहे़ तसेच प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागात पाणीपुरवठा योजनांसाठी ५ लाख रुपये देण्याची तरतूद केली आहे़ प्रभाग समितीला प्रत्येकी २५ लाख रुपये पाणीपुरवठा उपाययोजनांसाठी मंजुरी दिली आहे़ स्थायीचे शंभर आणि प्रभाग समित्यांचे व नगरसेवकांचे मिळून बोअर पाडण्याचा आकडा दोन-अडीचशेच्या पुढे जाऊ शकतो़ परंतु, भूजल विभागाकडून २०० फुटापर्यंतच बोअर पाडण्यास परवानगी आहे़ मागचा अनुभव पाहता २०० फुटांवर लातूर शहरात पाणी लागत नाही़ जर दोन-अडीचशे बोअर घेतली तर पैसे वाया जातील, अशी भीती नगरसेवकांसह मनपा प्रशासनाला आहे़ स्थायी समितीने शंभर बोअरसह प्रति ५ लाख आणि चार प्रभाग समित्यांना प्रत्येकी २५ लाख असा मोठा निधी मंजूर केला आहे़ हा सगळा पैसा बोअर पाडण्यास खर्ची केला तर पाणी लागेल का, असा प्रश्न आहे़ ४०० फुटांपर्यंत बोअर पाडण्यास परवानगी दिली तर पाणी लागण्याची आशा आहे, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे़ त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे ४०० फुटांपर्यंत बोअर पाडण्यास खास बाब म्हणून परवानगी द्यावी, अशी मागणी कालच केली आहे़ (प्रतिनिधी)लातूर शहराला दरदिवसाला ३़५ कोटी लिटर्स पाणी लागते़ सध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पात पाणीसाठा नाही़ त्यामुळे या प्रकल्पावरील भार कमी करण्यासाठी नगरसेवक स्वत:च्या विकास फंडातून बोअर पाडू इच्छित आहेत़ तसेच स्थायी समितीनेही शंभर बोअर पाडण्यास परवानगी दिली आहे़ प्रभाग समितीलाही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन मनपा प्रशासनाने केले आहे़ जवळपास २०० ते २५० बोअर शहरात घेण्याचे नियोजन आहे़ त्यामुळे शासनाने खास बाब म्हणून ४०० फुटांपर्यंत बोअर पाडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नगरसेवक राजा मणियार, शैलेश स्वामी यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे केली़ ४गेल्या तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले आहे़ पाणीसाठे कोरडे पडले असून, जमिनीतील पाणीपातळीची घट झाली आहे़ २०० फुटांवर तर कोठेच पाणी नाही़ त्यामुळे ४०० फुट खोल बोअर पाडण्याचा विचार बोलून दाखविला आहे़ त्यावर शासन सकारात्मक निर्णय देईल, अशी आपेक्षा राजा मणियार आणि यांनी व्यक्त केली़