पोलीस शिपाई प्रेयसीच्या मदतीने फौजदाराची पत्नीला मारहाण; दोघांचेही झाले निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 15:28 IST2021-04-19T15:27:15+5:302021-04-19T15:28:47+5:30
Crime News शैलेश आणि गुन्हा दाखल झालेली महिला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात.

पोलीस शिपाई प्रेयसीच्या मदतीने फौजदाराची पत्नीला मारहाण; दोघांचेही झाले निलंबन
औरंगाबाद : पत्नीला मारहाण करून घरात कोंडून ठेवल्याचा गुन्हा वेदांतनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने ग्रामीणचे फौजदार व पोलीस शिपाई महिलेची चौकशी करून तडकाफडकी त्या दोघांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी काढले आहेत.
वैशाली शैलेश जोगदंड (वय ३५, रा, स्नेहनगर) व शैलेश जोगदंड हे पती -पत्नी असून, शैलेश आणि गुन्हा दाखल झालेली महिला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. या दोघांनी फिर्यादीच्या घराचा कडी-कोंडा तोडून फिर्यादीच्या घरात शिरून शिवीगाळ केली. तसेच घरातील टीव्ही व आरसा फोडून नुकसान केले.
हात-चापटांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकीही दिली. महिलेच्या तक्रारीवरून वेदानंनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अहवाल ग्रामीण अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाल्यामुळे दोघांचेही तडकाफडकी निलंबन करण्यात आले. उपनिरीक्षक शारदा लाटे तपास करीत आहेत.