५० रुपयांचे आमिष देऊन वडिलांच्या मित्राने केला चिमुकलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2023 19:26 IST2023-06-09T19:25:03+5:302023-06-09T19:26:16+5:30

आरोपीने कुणाला काही सांगितले तर जीवे मारून टाकण्याची धमकी पिडीतेला दिली

Father's friend molested the little girl by offering Rs 50 as bait | ५० रुपयांचे आमिष देऊन वडिलांच्या मित्राने केला चिमुकलीवर अत्याचार

५० रुपयांचे आमिष देऊन वडिलांच्या मित्राने केला चिमुकलीवर अत्याचार

सिल्लोड: ५० रुपयांचे आमिष दाखवून ७ वर्षीय चिमुकलीवर स्वतः च्या घरात नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना  ५ जून रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरात घडली. पिडीतेला त्रास सुरु झाल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी आज दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. शेख मुनवर उर्फ मंनु अनीस शेख असे आरोपीचे नाव आहे. 

आरोपीने कुणाला काही सांगितले तर जीवे मारून टाकण्याची धमकी तिला दिली. भीतीपोटी मुलीने घरात काही सांगितले नाही. मात्र, तिला त्रास होत असल्याने आईने दवाखान्यात नेले. येथे तपासणीत डॉक्टरांना चिमुकलीवर अत्याचार झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर आईने विश्वासात घेऊन विचारले असता, वडिलांच्या मित्रानेच ५० रुपये देण्याचे आमिष देत घरी घेऊन जात अत्याचार केल्याचे चिमुकलीने सांगितले.

दरम्यान, पीडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सिल्लोड शहर पोलिसांनी ९ जून रोजी दुपारी १.५५ वाजता गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी शेख मुनवर उर्फ मंनु अनीस शेख ( रा.सिल्लोड ) यास लागलीच ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नालंदा लांडगे करत आहेत. 

Web Title: Father's friend molested the little girl by offering Rs 50 as bait