शेतकऱ्यांनो उपाशीपोटी फवारणी टाळा, अन्यथा विषबाधा अटळ; अशी घ्या खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 19:54 IST2025-08-04T19:54:34+5:302025-08-04T19:54:54+5:30

तणनाशक व कीटकनाशक फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्यास विषबाधेचा धोका संभवतो.

Farmers should avoid spraying while hungry; otherwise, poisoning is inevitable, take precautions | शेतकऱ्यांनो उपाशीपोटी फवारणी टाळा, अन्यथा विषबाधा अटळ; अशी घ्या खबरदारी

शेतकऱ्यांनो उपाशीपोटी फवारणी टाळा, अन्यथा विषबाधा अटळ; अशी घ्या खबरदारी

सोयगाव : विषयुक्त कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करावी, उपाशीपोटी फवारणी करू नये, अन्यथा विषबाधा होण्याची शक्यता असते, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी रमेश गुंडीले यांनी शुक्रवारी दिली.

तणनाशक व कीटकनाशक फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्यास विषबाधेचा धोका संभवतो. यापूर्वी अशा घटना घडल्या असून, फवारणीदरम्यान दक्षता घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. फवारणीचे काम आठ तासांवर करू नये, फवारणी करतेवेळी अशक्तपणा व चक्कर येणे, त्वचेची जळजळ होणे, पाणी येणे, अंधुक दिसणे, तोंडातून लाळ येणे, तोंडाची आग होणे अशा समस्या किंवा त्रास जाणवू शकतो, असे गुंडीले यांनी सांगितले.

फवारणी करताना घ्या ही काळजी
- कीटकनाशकांचे मिश्रण लाकडी काठीने मिसळा.
- फवारणीवेळी हातमोजे, बूट, मास्क, चष्मा वापरा.
- औषध अंगावर उडाल्यास त्वरित धुवा.
- फवारणीनंतर आंघोळ करा आणि कपडे धुवा
- कीटकनाशकाचा चुकूनही वास घेऊ नये.

शेतकऱ्यांनी घ्यावयाची खबरदारी
- उपाशीपोटी फवारणी करू नये.
- वाऱ्याच्याविरूद्ध फवारणी टाळा.
- धूम्रपान, अन्नपदार्थ वापर टाळा.
- विषबाधा झाल्यास पहिले तातडीने जवळच्या सरकारी दवाखान्यात जा.
- १०८ या टोल फ्री क्रमांकावर रुग्णवाहिकेस संपर्क साधा.
- रुग्णाला शक्य तितक्या लवकर वैद्यकीय मदत मिळवून द्यावी.

Web Title: Farmers should avoid spraying while hungry; otherwise, poisoning is inevitable, take precautions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.