शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या आईची ओटी भरण्यासाठी शेतकरी सज्ज

By admin | Updated: June 24, 2014 00:33 IST

रमेश शिंदे , औसा ८ जूनला मृग नक्षत्राची सुरुवात झाली. त्यामुळे पाऊस आज पडेल, उद्या पडेल या अपेक्षेने शेतकरी दररोज वरुणराजाच्या हजेरीकडे डोळे लावून बसला आहे.

रमेश शिंदे , औसा८ जूनला मृग नक्षत्राची सुरुवात झाली. त्यामुळे पाऊस आज पडेल, उद्या पडेल या अपेक्षेने शेतकरी दररोज वरुणराजाच्या हजेरीकडे डोळे लावून बसला आहे. मृग नक्षत्राचे १५ दिवस उलटले, परंतु पाऊस मात्र आलाच नाही. सोमवारी आर्द्रा नक्षत्राची सुरुवात झाली. शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी राजा मोठ्या पावसाची वाट पाहत काळ्या आईची ओटी भरण्यासाठी सज्ज झाला आहे.औसा तालुका हा पावसाळी पाण्यावर अवलंबून आहे. १ लाख २१ हजार ७२० हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास ९ लाख क्षेत्रावर खरिपाची पेरणी होते. मागील चार-पाच वर्षांपासून खरीप हंगामासाठी वेळेवर पाऊस न पडणे, पेरण्या झाल्यानंतरही पावसात खंड पडणे, झालाच तर जास्तीचा पाऊस होणे आणि तोही पिके काढणीला आल्यानंतर, अशी परिस्थिती असते. त्यामुळे औसा तालुक्यातील शेतकरी आणि शेती व्यवसाय कोलमडून पडला आहे. किमान यावर्षी तरी चांगला पाऊस पडेल आणि मृग नक्षत्रात वेळेवर पेरण्या होतील. मागील चार-पाच वर्षांपासून झालेली शेती व्यवसायाची वाताहत थांबेल, अशी आशा शेतकरी बाळगून होता; परंतु या सर्वच अपेक्षावर मृग नक्षत्राने पाणी फेरले आहे. मृग नक्षत्रच कोरडे गेल्यामुळे आता शेतकऱ्यांची आशा आर्द्रा नक्षत्रावर आहे. मागील वर्षी अर्ध्या तालुक्यात पेरणीसाठी वेळेवर पाऊस झाला होता. अर्ध्या तालुक्यात मात्र पावसाच्या विलंबामुळे पेरण्याही उशिराच झाल्या. मध्येच पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप हंगाम म्हणावा तसा शेतकऱ्यांच्या हाती लागला नाही. त्यानंतर रबी हंगाम हाता-तोंडाशी आल्यानंतर गारपिटीने उद्ध्वस्त केला. त्यामुळे मागील वर्षी शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. तरीही शेतकरी काळ्या आईची ओटी भरण्यासाठी नव्या उत्साहाने सज्ज झाला आहे. परंतु, मृग नक्षत्र कोरडेच गेला असून, आर्द्रा नक्षत्रातही पावसाची काय परिस्थिती राहील, याच चिंतेत शेतकरी दिसून येत आहेत.निसर्गाचा लहरीपणा...निसर्ग लहरी बनला असून, आता शेती करणे नको वाटत आहे. कारण शेतामध्ये केलेला खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ लागत नाही. कधी कधी तर उत्पन्न कमी आणि खर्च अधिक, अशी अवस्था होत आहे. त्यामुळे या अल्पश: उत्पादनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे, अशी प्रतिक्रिया गणेश सूर्यवंशी, विकास कदम, राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्यांनी दिली आहे.