शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एक एकरात सधन झाला शेतकरी

By admin | Updated: July 1, 2014 01:05 IST

फकिरा देशमुख , भोकरदन केवळ एक एकर शेतीमध्ये दोन जिल्ह्यात फुलांच्या व्यवसायाचा विस्तार करून वालसा खालसा येथील एका शेतकऱ्याने तालुक्यात सधन शेतकरी म्हणून ओळख निर्माण करून एक आदर्श निर्माण केला आहे.

फकिरा देशमुख , भोकरदनकेवळ एक एकर शेतीमध्ये दोन जिल्ह्यात फुलांच्या व्यवसायाचा विस्तार करून वालसा खालसा येथील एका शेतकऱ्याने तालुक्यात सधन शेतकरी म्हणून ओळख निर्माण करून एक आदर्श निर्माण केला आहे.सुभाष पुंडलिक जाधव असे या शेतकऱ्याचे नाव आहे. जाधव यांनी पत्नी सिंधूबाई यांच्या सहाय्याने एक एकर शेतीमध्ये नियोजन केल्याने २० एकरची शेती करणाऱ्या शेतकऱ्याची आर्थिक बाबतीत बरोबरी करण्याचा प्रयत्न केला आहे. सुभाष जाधव यांच्या शेतजमिनीचे क्षेत्र एक एकर दहा गुंठे एवढे आहे. एवढ्या कमी क्षेत्रात काय करावे, असा प्रश्न सर्वप्रथम त्यांना पडला. कारण आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याने व निसर्गाच्या लहरीपणामुळे या शेतीत काय पीक निघू शकेल, या विचाराने त्यांच्यासमोर फुलांच्या शेतीचा पर्याय उभा राहिला. २० गुंठ्यामध्ये त्यांनी गुलाबाची सहाशे झाडे लावली. तर गुंठ्यात गलांडा, काही भागात निशीगंधा आणि उर्वरित क्षेत्रात तुरीची झाडे, पपई, १० गुंठ्यात कपाशी लावली. एकाच एकरमध्ये वेगवेगळे पीक घेऊन आपल्या कुटुंबियाच्या उदरनिर्वाहासह आर्थिक प्रगतीकडे त्यांनी केलेली वाटचाल सद्यस्थितीत शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण करणारी आहे. जाधव यांच्या शेतातील गुलाबाची फुलांची बाग सजलेली आहे. दररोज ५०० फुलांची विक्री होते. फुलांचे पार्सल एस.टी. बसद्वारे बुलढाण्याला पाठविण्याची कल्पनाही त्यांचीच. दररोज फुलांचे पार्सल भोकरदन येथून बुलढाण्याला तसेच तालुक्यातील काही गावांमध्ये पाठविले जाते. फुले खरेदी करणाऱ्यांची एक यादी त्यांनी तयार केली असून दररोज फुलांचे पार्सल मिळते किंवा नाही, याची खात्रीही ते संबंधितांकडे दूरध्वनीद्वारे संपर्क साधून करतात. सध्या पाऊस नसल्याने पपईऐवजी २० गुंठ्यात कपाशीवरच त्यांनी भर दिला आहे. सुभाष जाधव व सिंधूबाई जाधव यांनी दूर अंतरावरून डोक्यावर पाणी आणून गुलाबाची बाग जगविली आहे. मुले दीपक, अमोल आणि गजानन या तिघांनाही पदवीपर्यंतचे शिक्षण देऊन आपल्या मेहनतीचे फळ केवळ व्यवसायातच नव्हे, तर कुटुंबाच्या शैक्षणिक प्रगतीतही त्यांनी मिळवून दाखविले आहे. जाधव यांचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांच्या घरात आहे.२० गुंठ्यामध्ये त्यांनी गुलाबाची सहाशे झाडे लावली. तर गुंठ्यात गलांडा, काही भागात निशिगंधा आणि उर्वरित क्षेत्रात तुरीची झाडे, पपई, १० गुंठ्यात कपाशी लावली. एकाच एकरमध्ये वेगवेगळे पीक घेऊन आपल्या कुटुंबियाच्या उदरनिर्वाहासह आर्थिक प्रगतीकडे त्यांनी केलेली वाटचाल सद्यस्थितीत शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण करणारी आहे.