शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार फ्लॅट विक्रीअभावी पडून

By admin | Updated: December 24, 2014 01:02 IST

शिरीष शिंदे , बीड पाच वर्षांपूर्वी बांधकाम व्यवसायाला सोनेरी दिवस प्राप्त झाले होते. अल्पावधीत श्रीमंत होण्याचे स्वप्न पहात अनेक जण या व्यवसायात उतरले,

शिरीष शिंदे , बीडपाच वर्षांपूर्वी बांधकाम व्यवसायाला सोनेरी दिवस प्राप्त झाले होते. अल्पावधीत श्रीमंत होण्याचे स्वप्न पहात अनेक जण या व्यवसायात उतरले, जमीनी खरेदी करुन अपार्टमेंट उभी केली मात्र त्यांच्या स्वप्नावर दुष्काळाने पाणी फेरले आहे. दुष्काळाचा परिणाम फ्लॅट विक्रीवरही झाला असून जवळपास पाच हजार फ्लॅट रिक्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. २००८ ते २०१० वर्षांच्या कालावधीत फ्लॅट व प्लाटींगचा टें्रड तेजीत आला होता. त्यामुळे जमिनी खरेदी करुन पलटी करुन विक्री केल्या जात होती. १० लाखांची जमीन खरेदी करुन दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत १५ लाखांचा विक्री केली जायची. मात्र हा प्रकार अतिशय जोखीमपूर्ण होता. तरीही अनेकजण यात उतरले होते. तर काही जणांनी बांधकाम करुन फ्लॅट विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. यात फारशी जोखीम नसल्याचे प्रथमदर्शनी वाटले होते. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी नवीन अपार्टमेंट्स व रो-हाऊसेस बांधल्याचे दिसून आहे. भक्ती कंस्ट्रक्शन, शिंदे नगर, जालना रोड परिसर, गुरुकुल नगर परिसर यासह नगर रोड, चऱ्हाटा रोड, बार्शी रोड या भागांचा समावेश आहे. आता गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळाचे वातावरण निर्माण झाले असल्यामुळे बांधण्यात आलेले अपार्टमेंट्स रिकामी पडली आहेत. यामुळे करोडो रुपयांची उलाढाल ठप्प पडली आहे. दुष्काळासह अनेक कारणेजिल्ह्यात मोठ्या कंपन्या, मोठे उद्योग नाहीत. रेल्वेचा प्रश्न रखडला असल्या कारणामुळे अर्थ व्यवस्थेला गती मिळालेली नाही. जवळपास सर्व उद्योग व धंदे हे पावसावर अवलंभून आहेत. त्यातच दुष्काळ पडला आहे. प्रत्येक कारण हे दुसऱ्या कारणाशी जोडले गेले असल्यामुळे एकंदरीत सर्वांचा परिणाम झाला आहे. पाणी कमी तरीही बांधकामे सुरुचजिल्ह्यात पाणी प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अशी बिटक परिस्थिती असतानाही शहरात सर्रासपणे बांधकामे जोरात सुरु आहेत. बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. अनेकजण बोअरच्या पाण्यावर बांधकामे उरकत चालली आहेत तर काही जण नगर परिषदेकडून मिळणाऱ्या पाण्यावर बांधकामे करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. नगर परिषदेने पाणी समस्या गंभीर बनली असताना बांधकामांना परवानगी देणे बंद केले पाहिजे. जेणे करुन पुढील वर्षाच्या जून महिन्यापर्यंत पाणी मिळू शकले. जमिनीतून आणि तलाव, तळे या माध्यमातून मिळणाऱ्या पाण्याच्या स्त्रोतचा बेसुमार वापर थांबविला नाही तर येत्या दोन महिन्यांत पाणी समस्या आणखी बिकट बनेल यात शंका नाही. पाणी पूणर्भरणाची आवश्यकता वाढलीजमिनीची पाणी पातळी वाढवी याची जबाबदारी केवळ शासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे. शहरात रो-हाऊस, अपार्टमेंट्स, घराची बांधकामे होत आहेत, झाली आहेत मात्र पावसाचे पाणी साठवण्याची पद्धत कोठेच दिसून येत नाही. ‘ रेन हार्वेस्टींग’ पद्धती सर्वांना कंपलसरी करायला हवी. असे केले तर घरावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरेल व पाणी पातळी वाढण्यास मदत होईल.४गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. ४त्यामुळे जवळपास ७० टक्के म्हणजेच चार ते पाच हजार फ्लॅट्स विक्री अभावी पडून आहेत.४यामुळे शासनाने रेडी रेकनरचा दर कायम ठेवावा अशी मागणी शासनाकडे केली असल्याची माहिती के्रडाई बीडचे अध्यक्ष सुरज तेंडुलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे रेडी रेकनरचे दर कायम ठेवावेत अशी मागणी के्रडाई बीडच्यावतीने शासनाकडे करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षापासून फ्लॅट विक्री मंदावली असल्याने रेडी रेकनर दर कायम ठेवावेत अशी मागणी करण्यात आली आहे. हे दर कायम ठेवल्यास सर्व सामान्यांना घर खरेदी करणे शक्य होईल. दर वर्षी प्रॉपर्टीच्या किमती २० ते २५ टक्क्यांनी वाढत चालल्या आहेत. १ जानेवारी रोजी जाहीर होणाऱ्या रेडी रेकनर ८ ते १० टक्क्यांनी वाढल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.