शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

तोतया पोलिसाने नोकरीचे आमिष देऊन पाच लाख लुबाडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 5:51 PM

वन विभागात लिपिकपदी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ओळखीच्या कुटुंबाकडून पाच लाख रुपये घेऊन पसार

औरंगाबाद : वन विभागात लिपिकपदी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ओळखीच्या कुटुंबाकडून पाच लाख रुपये घेऊन पसार झालेल्या तोतया पोलिसाला मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली.

रवींद्र नाना दांडगे ऊर्फ राजेंद्र जाधव (३२, रा. चेतनानगर, हर्सूल) असे अटकेतील तोतया पोलिसाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की,  संघर्षनगर, मुकुंदवाडी येथील विजय सीताराम हिवाळे हे शासकीय सेवेत आहेत. आरोपी हा त्यांच्या ओळखीचा आहे. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात आरोपी त्यांना भेटला तेव्हा त्याने तो पोलीस कर्मचारी असून, जालना येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगितले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चांगली ओळख असल्याने आपण आतापर्यंत अनेकांना नोकरीला लावले आहे. कोणाला नोकरीला लावायचे असेल तर सांगा, अशी थाप त्याने मारली. हिवाळे यांचा भाचा पदवीधर असून तो नोकरीच्या शोधात आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या भाच्याला नोकरीची गरज असल्याचे सांगितले. ‘मी तुमच्या भाचाला वन विभाग अथवा जेल विभागात क्लार्कपदी नोकरीला लावू शकतो. मात्र त्याकरिता पाच लाख रुपये द्यावे लागतील’, असे  तो म्हणाला.

त्यानंतर तक्रारदारांनी त्यांचे भावजी, बहीण आणि भाचे यांच्यासोबत आरोपीची भेट घेतली. तेव्हा त्याने तातडीने दोन लाख रुपये आणि नोकरीची आॅर्डर हातात पडल्यानंतर तीन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांनी पैशाची जमवाजमव करून आरोपीला दोन लाख रुपये दिले. त्याने तीन महिन्यांत नोकरीचे काम होईल, तेव्हा उर्वरित पैशांची तयारी करा, असे म्हणून तो पैसे घेऊन निघून गेला. 

एक महिन्यानंतर आरोपीने त्यांना फोन करून सांगितले की, तुमच्या भाच्याच्या नोकरीचे काम झाले आहे. तुम्ही तीन लाख रुपये द्या.  आरोपीच्या सांगण्यावरून तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांनी तीन लाख रुपये आरोपीला दिले. 

मुंबईला मंत्रालयात नेले अन् पोबारा केला..मंत्रालयातून आॅर्डर आणण्यासाठी मुंबईला जायचे आहे, अशी थाप मारून आरोपीने तक्रारदार, त्यांचे भावजीस मुंबईला नेले. ‘मी सरकारी कर्मचारी असल्याने मला मंत्रालयात प्रवेशिका लागत नाही. तुम्ही प्रवेशिका घेऊन दुसऱ्या गेटने वन विभागात या,’ असे तो त्यांना म्हणाला. नंतर आरोपीने फोन बंद करून तो गायब झाला. दिवसभर  थांबूनही तो भेटला नाही. तक्रारदार परत आले आणि त्यांनी थेट आरोपीविरोधात मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक बनसोड यांनी आरोपीला अटक केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस