शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
2
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
3
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
4
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
5
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
6
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
7
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
8
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
9
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
10
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
11
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
13
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
14
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
15
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
16
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
17
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
18
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
19
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
20
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

फ.मुं.शिंदे यांनीही लढवली होती निवडणूक

By admin | Updated: September 29, 2014 00:06 IST

बालासाहेब काळे, हिंगोली सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून मागील काही निवडणुकांचा आढावा घेतला असता प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार रिंगणात उतरल्याचे दिसत आहे.

बालासाहेब काळे, हिंगोली
सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून मागील काही निवडणुकांचा आढावा घेतला असता प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार रिंगणात उतरल्याचे दिसत आहे. १९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये हिंगोली, वसमत व कळमनुरी तब्बल ४३ उमेदवारांचा समावेश होता. यात अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष प्रसिद्ध कवी फ.मुं.शिंदे यांनी जनता दलातर्फे भाग घेतला होता.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून १९९५ साली विठ्ठलराव चंपतराव नाईक (मस्के) यांनी कम्युनिस्ट पार्टी आॅ.ई.कडून निवडणूक लढवून ४५ हजार ५३१ मतांनी विजय मिळवला. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अ‍ॅड.शिवाजी माने यांना ३७ हजार १४४ मते मिळाली होती. फ.मुं.शिंदे यांना २ हजार ५३८ मते मिळाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार गंगाराम जाधव यांना ८ हजार ९७७ तर रिपाइंचे जयाजी पाईकराव यांना १ हजार ८५६ मते मिळाली. या निवडणुकीत १५ अपक्ष उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. यात गणेशराव बळवंत यांना अपक्षांमधील सर्वाधिक १० हजार ८४५ मते मिळाली.
वसमत मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार डॉ.जयप्रकाश मुंदडा यांनी ५३ हजार ५१४ मते घेऊन विजय मिळवला होता. भारिप- बहुजन महासंघाचे मारोती पिसाळ यांना २५ हजार २१० मते मिळाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सखाराम बागल यांना ९ हजार ४२३ तर अपक्ष म्हणून लढलेले जयप्रकाश दांडेगावकर यांना १४ हजार २६० मते मिळाली होती. या निवडणुकीच्या रिंगणात १५ अपक्ष होते.
हिंगोली विधानसभा मतदारसंघातून १९९५ मध्ये भाजपाचे उमेदवार बळीराम पाटील कोटकर यांनी ३६ हजार २५७ मते घेऊन विजय संपादन केला होता. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार साहेबराव पाटील यांना ३३ हजार २०७ तर भारिप- बहुजन महासंघाचे उमेदवार माधवराव नाईक यांना २५ हजार २५१ मते मिळाली होती. जनता दलाचे केशव राठोड यांना ४ हजार ९५५ तर दूरदर्शी पार्टीचे ज्ञानदेव चौधरी यांना १ हजार ३९५ मते मिळाली होती. या निवडणुकीमध्ये १३ उमेदवारांनी अपक्ष म्हणून लढा दिला.