शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यमान नगराध्यक्षांना मुदतवाढ, इच्छुक नाराज

By admin | Updated: June 24, 2014 00:40 IST

हदगाव : विद्यमान नगराध्यक्षांच्या कार्यकाळास ६ महिन्याची मुदतवाढ मिळाल्याने नगराध्यक्ष पदासाठी उत्सुक असलेल्या नगरसेवकांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे़

हदगाव : विद्यमान नगराध्यक्षांच्या कार्यकाळास ६ महिन्याची मुदतवाढ मिळाल्याने नगराध्यक्ष पदासाठी उत्सुक असलेल्या नगरसेवकांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे़राज्यात पुढील चार-सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणुका असल्याने महापौर, नगराध्यक्ष यांच्या कार्यकाळास सहा महिन्याची मुदतवाढ दिली आहे़ हदगाव नगरपालिकेमध्ये १७ सदस्य असून त्यापैकी १५ सदस्य काँग्रेसचे असून २ सदस्य शिवसेनेचे आहेत़ येथील नगराध्यक्षाचा कार्यकाळ जूनमध्ये संपत आहे़ या महिन्यात २१ तारखेला तसा कार्यक्रम निवडणूक जाहीर होणार होता़ परंतु शासनाच्या निर्णयामुळे त्यांच्या कार्यकाळास सहा महिन्याची मुदतवाढ मिळाली आहे़यापूर्वी अनुसूचित जातीच्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मान श्रीमती अंजनाबाई सोनुले यांना मिळाला होता़ आता नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून काँग्रेसचे बहुमत असल्याने हदगाव नगरपालिका पुन्हा काँग्रेसचाच नगराध्यक्ष होणार हे अगदी स्पष्ट आहे़या मुदतवाढीमुळे पक्षश्रेष्ठीचा ताण कमी झाला असून विधानसभेचे काम या पदाच्या आश्ेने सर्वच संभाव्य उमेदवारांना करावे लागणार आहे़ या निवडीचा परिणाम विधानसभेवर निश्चित झाला असता किंवा विरोधकांनी तसे रान पेटविले असते़ या वृत्ताला उपविभागीय अधिकारी विवेक घाडके यांनी दुजोरा दिला़जुगाऱ्यांना पकडलेमांडवी : उमरी बाजार येथील आरोपी तुळशीराम चौधरी व इतर ९ जणांना जुगार खेळतांना पोलिसांनी पकडले़ जमादार गुणवंत सलामी यांनी या प्रकरणाची फिर्याद नोंदवली़ परिसरात सुरु असलेल्या अन्य अवैध व्यवसायाकडेही पोलिसांनी ‘लक्ष’ द्यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)