खळबळजनक ! एकाच झाडावर अल्पवयीन मुलीसह तरुणाचा गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 18:40 IST2021-11-23T18:39:05+5:302021-11-23T18:40:44+5:30

एकमेकांचे शेत शेजारीच असल्याने दोघांच्याही कुटुंबाला बसला धक्का

Exciting! Young man strangled with a minor girl on the same tree | खळबळजनक ! एकाच झाडावर अल्पवयीन मुलीसह तरुणाचा गळफास

खळबळजनक ! एकाच झाडावर अल्पवयीन मुलीसह तरुणाचा गळफास

शिवना ( औरंगाबाद ) : एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी व २० वर्षीय तरुणाने शेतातील एकाच झाडावर गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना सोमवारी सकाळी सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार येथे उघडकीस आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

जळकी बाजार येथील अस्तिककुमार दांडगे व कैलास दांडगे यांचे शेत शेजारीच आहे. सोमवारी सकाळी अस्तिककुमार यांचा मुलगा शरद व कैलास दांडगे यांची अल्पवयीन मुलगी राजनंदिनी यांनी त्यांच्या बरडावरील शेतात सोमवारी सकाळी एका लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. दांडगे कुटुंबीय शेतात गेल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली.

घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. अजिंठा पोलीस ठाण्याचे सपोनि. अजित विसपुते, फौजदार राजू राठोड, पोहेकॉ. विकास चौधरी, बाबा चव्हाण, संदीप जाधव, चालक राम माळी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचेही मृतदेह फासावरून खाली उतरवून पंचनामा केला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी अजिंठा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मयत शरदच्या चुलत भावाने दिलेल्या माहितीवरून अजिंठा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास फौजदार राजू राठोड हे करीत आहेत.

Web Title: Exciting! Young man strangled with a minor girl on the same tree