शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

परीक्षा विभागात ‘अभाविप’चे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:55 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उघडकीस आलेल्या नापास विद्यार्थ्यांना पदवी वाटप प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे परीक्षा भवनातील संचालकांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेतर्फे परीक्षा संचालकांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली.

ठळक मुद्देनापास विद्यार्थ्यांना पदवी वाटप प्रकरण : परीक्षा संचालकांच्या राजीनाम्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उघडकीस आलेल्या नापास विद्यार्थ्यांना पदवी वाटप प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे परीक्षा भवनातील संचालकांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेतर्फे परीक्षा संचालकांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली.‘लोकमत’ने १४ जुलै रोजी नापास विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आल्याचा भंडाफोड केला होता. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सलग तिसऱ्या दिवशी विद्यापीठात आंदोलन करण्यात आले. ‘अभाविप’च्या पदाधिकाºयांनी गुरुवारी सकाळी १२ वाजेदरम्यान परीक्षा भवनातील परीक्षा संचालकांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या दिला. कार्यालयात परीक्षा संचालक नसल्यामुळे एका खुर्चीवर दगड ठेवण्यात आला. तसेच परीक्षा संचालकांनी राजीनामा दिल्याशिवाय उठणार नसल्याची भूमिका घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता.आंदोलनस्थळी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी धाव घेऊन कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. याच वेळी पोलीसही दाखल झाले. तेव्हा कुलसचिव डॉ. साधना पांडे म्हणाल्या, या प्रकरणात चौकशी समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले आहे. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात यावे, तेव्हा ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी लेखी लिहून देण्याच्या अटीवर आंदोलन मागे घेतले.यावेळी प्रदेशमंत्री अभिजित पाटील, महानगर सहमंत्री विवेक पवार, महाविद्यालय प्रमुख शिवा देखणे, गोविंद देशपांडे, आरती तांदळे, सोनू क्षीरसागर, निखिल आठवले, श्याम कातखडे, प्रभाकर माळवे, शुभम स्नेही, आशिष वडोदकर, महेंद्र मुंडे, आशिष आणेराव, ज्ञानेश्वर उद्देवाल, नितीन केदार, गोरख केंद्रे, शिवाजी वरपे आदी उपस्थित होते.साईनंतर काय सुधारणा झाली?चौका येथील साई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रकरणात विद्यापीठाची राष्ट्रीय पातळीवर बदनामी झाली. तेव्हा परीक्षा विभागात अनेक बदल केले. मात्र एका वर्षाच्या आत सर्वच बदल पूर्ववत झाल्याचे दिसून येते. यामुळे परीक्षा संचालकांसह इतर दोषींवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अभाविपचे प्रदेशमंत्री अभिजित पाटील यांनी यावेळी केली.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थीagitationआंदोलन