विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ९ मे पासून परीक्षा

By विजय सरवदे | Updated: April 6, 2023 20:06 IST2023-04-06T20:05:50+5:302023-04-06T20:06:14+5:30

अभ्यासक्रम पूर्ण न झाल्यामुळे पुढे ढकलल्या परीक्षा

Examination of the university's postgraduate course from May 9 | विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ९ मे पासून परीक्षा

विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ९ मे पासून परीक्षा

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा ९ मे पासून सुरू होणार आहेत, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. भारती गवळी यांनी कळविले आहे.

विद्यापीठाने या संदर्भात कार्यक्षेत्रातील शैक्षणिक विभाग, संलग्नित महाविद्यालये, परिसंस्थातील विभागप्रमुख, प्राचार्य, संचालकांना सोमवारी पत्राद्वारे कळविले आहे. मार्च / एप्रिल २०२३ च्या सर्व पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा १८ व २५ एप्रिलपासून आयोजित करण्यात आल्या होत्या. परंतु, विविध पदव्युत्तर इतर अभ्यासक्रमांचे निकाल घोषित झालेले नाहीत. काही ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार कुलगुरूंच्या आदेशान्वये सर्व पदव्युत्तर, व्यावसायिक व इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षा मंगळवार, दि. ९ मे पासून आयोजित करण्यात आल्या आहेत.

Web Title: Examination of the university's postgraduate course from May 9