शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दररोज येताहेत प्रस्ताव... टँकरची मागणी वाढली

By admin | Updated: November 26, 2014 01:09 IST

लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे़ जिल्ह्यातील ९५ गावांत पाणीटंचाईचे सावट आहे़ यापैकी ३५ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली असून,

लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे़ जिल्ह्यातील ९५ गावांत पाणीटंचाईचे सावट आहे़ यापैकी ३५ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली असून, त्यापैकी केवळ १८ गावांच्या अधिग्रहणाला मंजुरी देण्यात आली आहे़ तरी एकूण ६ गावांनी टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे़ दरम्यान प्रशासनाने २ गावांना २ टँकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे़ त्यात औसा तालुक्यातील १ व अहमदपूर तालुक्यातील १ गावचा समावेश आहे़जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला असून, अधिग्रहण, विंधन विहिरी, नळ दुरुस्ती, पूरक नळ योजना, विंधन विहिरींची दुरुस्ती आदी उपाययोजनांचे नियोजन केले आहे़ जशी मागणी येईल, त्यानुसार प्रस्ताव घेण्यात येत आहे़ जिल्ह्यातील गावे व वाडी तांडे मिळून ९५ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली आहे़ त्यातील ३५ प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविले असून, त्यातील १८ प्रस्ताव मंजूरही झाले आहेत़ तर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी लातूर तालुक्यातील १, औसा तालुक्यातील २ व अहमदपूर तालुक्यातील ३ अशा एकूण ६ गावांनी प्रस्ताव सादर केले आहेत़ औसा तालुक्यातील १ व अहमदपूर तालुक्यातील १ अशा २ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे़ लातूर तालुक्यातील १५, औसा तालुक्यातील ३७, निलंगा तालुक्यातील २०, रेणापूर तालुक्यातील ६, अहमदपूर तालुक्यातील १४, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील २ व जळकोट तालुक्यातील १ अशा एकूण ९५ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली़ त्यापैकी लातूर तालुक्यातील ७, औसा तालुक्यातील ६, निलंगा तालुक्यातील ३, अहमदपूर तालुक्यातील २ अशा एकूण १८ गावांतील अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली़ (प्रतिनिधी)४टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी जोर धरु लागली असून, दररोज या मागणीचे प्रस्ताव येत आहेत़ मंगळवारीच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात लातूर तालुक्यातील ३, औसा तालुक्यातील २, अहमदपूर तालुक्यातील ४ अशा एकूण ९ गावांनी टँकरने पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव दिला आहे़ गाव, वाडी-तांड्यावरुन मागणीचे प्रस्ताव येत आहेत़ प्रशासनाकडूनही उपलब्ध पाणी अधिग्रहण केले जात असून, स्वतंत्र टंचाई निवारण कक्ष तयार करण्यात आला आहे़ सध्या विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहण करण्यावर भर असून कृती आराखड्यानुसार पूरक नळयोजना, नळयोजनांची दुरुस्ती, नव्या विंधन विहिरी आदी कामांचे प्रस्तावही घेतले जात आहेत़