शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मालेगाव परिसराला ईसापूरचे २ दलघमी पाणी

By admin | Updated: December 18, 2015 00:01 IST

शरद वाघमारे, मालेगाव मालेगाव व नांदेड तालुक्यातील काही गावांना इसापूर धरणाचे दोन दलघमी पाणी सोडण्यात आले, पाणी आलेही. यासंदर्भात ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित केले होते.

शरद वाघमारे, मालेगाव मालेगाव व नांदेड तालुक्यातील काही गावांना इसापूर धरणाचे दोन दलघमी पाणी सोडण्यात आले, पाणी आलेही. यासंदर्भात ‘लोकमत’ ने १७ डिसेंबरच्या अंकात सविस्तरपणे वृत्त प्रकाशित केले होते. सदरील पाणी गिरगाव जि़हिंगोली दाभडी वितरीकेतून दिले जाणार असून पाण्याच्या अवैध उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाईही करण्यात येणार असल्याची माहिती उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मेश्राम यांनी दिली़ उर्ध्व पैनगंगेचे पाणी मालेगाव परिसराला मिळावे याबाबत लोकमतने सातत्याने पाठपुरावा केला होता़ मालेगाव परिसरातील मालेगाव, धामधरी, देगाव कु़, डौर, सावरगाव, उमरी, कामठा बु़ व नांदेड तालुक्यातील कासारखेडा,भालकी, चिखली आदी गावांना उर्ध्व पैनगंगेचे (ईसापूर) पाणी दाभडी नाल्यातून सोडावे अशी मागणी होते़ परंतु आरक्षित झालेले पाणी ०़३० दलघमी होते़ प्रत्यक्षात या गावांना पाणी मिळण्यासाठी वाढीव पाण्याची आवश्यकता होती़ याबाबत खा़अशोकराव चव्हाण व मालेगाव व नांदेड तालुक्यातील गावांनी वाढीव पाण्याची मागणी केली होती़ त्यामुळे उर्ध्व पैनगंगेचे पाणी गिरगाव वितरीकेतून दाभडी नाल्यातून धामधरी, मालेगाव, देगाव कु़, डौर, कासारखेडा, भालकी, चिखली, पासदगाव, इजळी, चिकाळा, सावरगाव, उमरी, कामठा बु़ आदी गावांना २ दशलक्ष घनमीटर पाणी सीतानदीमधून मिळणार आहे़