शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

पीटलाइन अपुरी असल्याचा फटका; छत्रपती संभाजीनगरहून नव्या रेल्वेचा मार्ग अवघड

By संतोष हिरेमठ | Updated: May 6, 2025 11:44 IST

पीटलाइन झाली तरी तिचा उपयोग कसा करणार? असा सवाल रेल्वे बोर्डाच्या सदस्यांनी उपस्थित केला आहे.

छत्रपती संभाजीनगर : पीटलाइन झाल्यानंतर नवीन रेल्वे सुरू होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र, पीटलाइन ही १६ बोगींची झाली आहे. ती अपुरी असल्याचा आता ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरहून नवीन रेल्वे सुरू होण्याचा मार्ग अवघड झाला आहे.

गेली अनेक वर्षे पीटलाइन नसल्याचे कारण पुढे करून नव्या रेल्वे सुरू करण्यास ‘रेड सिग्नल’ दाखविण्यात आला होता. कशीबशी पीटलाइन झाली तरी तिचा उपयोग कसा करणार? असा सवाल रेल्वे बोर्डाच्या सदस्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे १६ बोगींची पीटलाइन किमान १८ बोगींची करावी लागणार आहे. परंतु, पीटलाइनच्या मार्गात अतिक्रमणांपासून अनेक अडचणी आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरहून नवीन रेल्वे नजीकच्या काळात सुरू होणे अशक्य असल्याचे म्हटले जात आहे.

या रेल्वेंची आवश्यकता- छत्रपती संभाजीनगर - मुंबई एक्स्प्रेस / वंदे भारत एक्स्प्रेस.- छत्रपती संभाजीनगर -अकोला- नागपूर एक्स्प्रेस- छत्रपती संभाजीनगर- बंगळुरू / म्हैसूर सुपर फास्ट एक्स्प्रेस- नांदेड- छत्रपती संभाजीनगर-अहमदाबाद-जोधपूर एक्स्प्रेस- छत्रपती संभाजीनगर- पनवेल- तिरूअनंतपुरम एक्स्प्रेस- पूर्णा- पाटना एक्स्प्रेसचा विस्तार जालन्यापर्यंत

जालन्याला २६ बोगींची पीटलाइन, तिचा तरी वापर कराजालन्याला २६ बोगींची पीटलाइन आहे. याठिकाणी आजघडीला बोगी खराब झाल्यानंतर दुरूस्तीचे काम होत आहे. त्याबरोबर नियमित रेल्वे गाड्या स्वच्छ केल्या जात आहेत. पूर्णा - पाटणा एक्स्प्रेस, जालना - छपरा रेल्वे, वंदे भारत एक्स्प्रेसची देखभाल केली जाते. या पीटलाइनचा वापर करून छत्रपती संभाजीनगरहून नव्या रेल्वे सुरू करणे शक्य असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

अनास्थेमुळे नव्या रेल्वे मिळेनातमोठे औद्योगिक आणि पर्यटन केंद्र असूनही केवळ रेल्वे विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे छत्रपती संभाजीनगरला नवीन गाड्या मिळत नाहीत. पीटलाइन होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत काही महत्त्वाच्या गाड्या संभाजीनगरहून ‘टीओटी’ तत्त्वावर किंवा जालन्याची पीटलाइन वापरून सोडता येतील. तसेच काही गाड्या जालना अथवा नांदेडहून संभाजीनगरमार्गेही सोडता येतील.- स्वानंद सोळंके, मराठवाडा रेल्वे कृती समिती

जुलैपर्यंत काम पूर्णआगामी जुलैपर्यंत छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवरील पीटलाइनचे काम पूर्ण होईल. पीटलाइनच्या विस्तारीकरणासंदर्भातही निर्णय होईल.- प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) ‘दमरे’

टॅग्स :railwayरेल्वेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर