शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

दहा लाखांच्या कामासाठी दीड लाख घेऊनही महावितरणच्या अधिकाऱ्यांची हाव संपली नाही

By सुमित डोळे | Updated: July 11, 2024 19:37 IST

कन्नडला ‘बडे मासे’ जाळ्यात : एक लाख रुपये घेताना कार्यकारी अभियंता, उपव्यवस्थापक दालनातच चतुर्भूज

छत्रपती संभाजीनगर : रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) च्या केलेल्या चार कामांचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडून १ लाखांची लाच घेताना महावितरणचा कन्नडचा कार्यकारी अभियंता धनाजी रामुगडे व उपव्यवस्थापक प्रवीण दिवेकर (रा. पडेगाव) हे दोघे रंगेहात पकडले गेले. एसीबीने (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) ने बुधवारी रामुगडेच्या दालनातच सापळा रचून दोघांना अटक केली. विशेष म्हणजे, यापूर्वी दोघांनी ठेकेदाराकडून दीड लाख रुपये घेतले होते. मात्र, तरीही त्यांची हाव संपली नाही व ते सापळ्यात अडकले.

ठेकेदाराने काही दिवसांपूर्वी कन्नड विभागातील महावितरणच्या रोहित्राची चार कामे केली होती. त्या कामांचे प्रस्ताव मंजूर करून बिलाच्या अंतिम परवानगीसाठी रामुगडे व दिवेकर यांनी साडेतीन लाखांची मागणी केली. ठेकेदाराने त्यांना दीड लाख रुपये दिले. आरोपींनी ते पैसे मिळाल्यानंतर दोन कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले. उर्वरित दोन कामांसाठी पुन्हा दोन लाखांची मागणी करून त्रास दिला. अखेर ठेकेदाराने मंगळवारी थेट एसीबी अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. आटोळे यांच्या सूचनेवरून निरीक्षक अमोल धस यांनी खातरजमा केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

रूमाल लटकवण्याचा इशाराआरोपींनी आधी घेतलेल्या दीड लाखाचे पुरावे एसीबीला मिळाले. मंगळवारी उशिरा तडजोडीअंती रामुगडे १ लाखांवर तयार झाला. ठेकेदाराला त्याने दालनातच पैसे घेऊन येण्यास सांगितले. बुधवारी दुपारी निरीक्षक अमोल धस, अंमलदार युवराज हिवाळे, रवींद्र काळे, आत्माराम पैठणकर, सी. एन. बागूल यांनी महावितरण कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराला रूमाल लटकवण्याचा इशारा सांगण्यात आला होता. पैशांच्या लालसेने दिवेकर आधीच दालनात बसलेला होता. ठेकेदाराने इशारा करताच दबा धरून बसलेल्या पथकाने दालनात घुसून दोघांना उचलले.

इकडे अटक, तिकडे ठाण्यात छापेवर्ग एकचा अधिकारी असलेल्या रामुगडेला जवळपास दीड तर दिवेकरला १ लाख रुपये पगार आहे. बुधवारी दोघांना अटक होताच दिवेकरच्या पडेगावच्या घरी झाडाझडती सुरू झाली. मूळ ठाण्याचा असलेल्या दिवेकरच्या घरी ठाणे येथील एसीबी पथकाने छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत घरातील संपत्ती, दागिने, कागदपत्रांची छाननी सुरू होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग