ईव्हीएम, व्हिव्हिपॅट यंत्रांचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 20:44 IST2018-12-21T20:44:11+5:302018-12-21T20:44:38+5:30
चितेगाव : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चितेगावसर्कल मधील मतदारांची जनजागृती करण्याबरोबरच ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रात्यक्षिक ग्रामपंचायतीमध्ये ...

ईव्हीएम, व्हिव्हिपॅट यंत्रांचे प्रात्यक्षिक
चितेगाव : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चितेगावसर्कल मधील मतदारांची जनजागृती करण्याबरोबरच ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रात्यक्षिक ग्रामपंचायतीमध्ये दाखविण्यात आले.
पथक प्रमुख अविनाश निलेकर म्हणाले की, ईव्हीएममध्ये मतदारांत असलेले समज, गैरसमज दूर करण्यासाठी प्रशासनाकडून या दोन्ही यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे. या डेमो मशीनवर मतदारांना मतदान करतेवेळी अपण कोणाला मत दिले हे एका लहान स्क्रीनवर समोरच सात सेकंद दिसून येत आहे. त्यानंतर केलेल्या मतदानाची पावती डेमो चिन्हसह मतदारांना दाखविण्यात येत आहे.
सकाळी मोबाईल व्हॅनद्वारे मतदारांच्या भेटी घेऊन जनजागृती करून त्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यात येत होते. या पथकामध्ये पथक प्रमुख मंडळ अधिकारी अविनाश निलेकर, मास्टर ट्रेनर संदीप मांडे, तलाठी श्रीधर जमादार, बबन साबळे व एक पोलिस कर्मचारी या अधिकाऱ्यांचा समावेश होता. प्रात्यक्षिक वेळी कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट अशा मशीन प्रात्यक्षिक करिता उपलब्ध होत्या. या प्रसंगी सरपंच कडूबाळ नरवडे, उपसरपंच साईनाथ गिधाने, सोमनाथ पंढरे, दिलीप नरवडे, पॅर्थर रिपब्लिकन पार्टी चे पैठण तालुकाध्यक्ष अमोल नरवडे, किरण नरवडे, अन्ना नजन, विजय त्रिभुवन आदींची उपस्थिती होती.