शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

सभापती निवडीची समीकरणे बदलली

By admin | Updated: September 30, 2014 01:27 IST

बीड : युती, आघाडीतील फाटाफुटीने जिल्हा परिषदेत २ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या सभापती निवडीची समीकरणे पूर्णत: बदलली आहेत़ विधानसभा निवडणुकीतील राजकीय खेळ्यांमुळे

बीड : युती, आघाडीतील फाटाफुटीने जिल्हा परिषदेत २ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या सभापती निवडीची समीकरणे पूर्णत: बदलली आहेत़ विधानसभा निवडणुकीतील राजकीय खेळ्यांमुळे कोण बाजी मारणार? हे सांगणे कठीण बनत आहे़२१ सप्टेंबर रोजी जिल्हापरिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम पार पडला़ यावेळी युती व आघाडीकडे २९-२९ असे समसमान बलाबल होते़ रोमांचक वळणावर येऊन ठेपलेल्या या निवडी अखेर चिठ्ठया टाकून कराव्या लागल्या़ यात आघाडीचे नशिबच ‘लयं भारी ’ ठरले़ २ आॅक्टोबर रोजी विद्यमान सभापतींचा कार्यकाळ संपत आहे़ त्यामुळे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच सभापतीपदासाठी निवड प्रक्रिया पार पडत आहे़आता महायुती तुटली आहे़ जि़ प़ मध्ये आजघडीला भाजपाकडे २६ सदस्य असून दोन शिवसेनेचे आहेत तर रासपकडेही एक सदस्य आहे़ दुसरीकडे राष्ट्रवादीच्या तंबूत २८ सदस्य असून काँग्रेसकडेही एक सदस्य आहे़ अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत युती- आघाडीने फाटाफूट रोखली होती़ सभापती निवडीत समान संख्याबळामुळे चिठ्ठ्या टाकाव्या लागतील, अशी स्थिती कालपर्यंत होती; परंतु आता विधानसभेतील नाराजीने काहीही होऊ शकते असे चित्र आहे़विधानसभेतील नाराजीनेवाढविली चिंताविधानसभा निवडणुकीत उडालेला बंडाचा धुराळा अजून जमिनीवर नीट बसलेलाही नाही़ त्यातच सभापती निवडीचा कार्यक्रम होणार असल्याने सर्वच पक्ष धास्तावले आहेत़ माजलगावात भाजपाचे भाई गंगाभिषण थावरे विधानसभेसाठी इच्छुक होते़ पक्षाने त्यांचा पत्ता कट केल्यावर त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती़ त्यांच्या पत्नी जि़प़ सदस्या आहेत़ भाई थावरेंचा अर्ज बाद ठरला हे खरे;परंतु सभापती निवडीत त्यांची भूमिका काय असेल? हे सांगणे तूर्त कठीण बनले आहे़ एकनाथ आव्हाड यांच्या पत्नी गयाबाई या राष्ट्रवादीच्या सदस्या आहेत़ माजलगावचे उमेदवार प्रकाश सोळंके यांच्या प्रचारातून एकनाथ आव्हाडांनी अंग काढून घेतले आहे़ अशा स्थितीत गयाबाई आव्हाड यांच्या भूमिकेलाही महत्त्व आहे़ त्यामुळे दोन्ही पक्षाची चिंता वाढली आहे़जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या खुर्चीत विजयसिंह पंडित आहेत़ त्यामुळे ‘रिमोट’ आ़ अमरसिंह पंडित यांच्याकडे आहे़ ४सभापतीपदे राखण्यासाठी आ़ पंडित जोर लावतील़ ४युतीकडूनही तसे प्रयत्न होऊ शकतात़ विद्यमान सभापती संदीप क्षीरसागर, युद्धाजित पंडित यांना पुन्हा संधी मिळू शकते़ जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी युती, आघाडीने चांगलाच जोर लावला होता़ ४आता विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे़ ४सभापती, उपसभापती निवडी दोन दिवसांवर येऊन ठेपल्या तरी अद्याप कुठल्याच पक्षाची रणनीती ठरलेली नाही़ ४त्यामुळे सभापती निवडीत कोण कोणाला भारी ठरतो ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे़